Friday, November 15, 2024
Homeजळगावअमोल जावळेंच्या प्रचारार्थ महिला मेळावा ; लाडक्या बहिणींचा प्रतिसाद

अमोल जावळेंच्या प्रचारार्थ महिला मेळावा ; लाडक्या बहिणींचा प्रतिसाद

रावेर । प्रतिनिधी

महायुतीचे रावेर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी महिलांचा मेळावा आयोजित केला होता. या सभेत भाजपा महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्ष तथा आमदार चित्राताई वाघ यांनी या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केले. या जाहीर सभेत त्यांनी विरोधकांनी कशा पद्धतीने महिला सक्षमीकरणाच्या कार्यात आडकाठी निर्माण केली. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टात गेले. आणि आता तेच म्हणताय की आम्ही देखील तीन हजार रुपये देऊ. तेव्हा हे लबाडांचे आमंत्रण आहे. यांच्या भूलथापाला महिलांनी बळी पडू नये असे आवाहन त्यांनी या सभेत केले.

- Advertisement -

या सभेत भाजपा राज्य महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष जयश्री सोनवणे, डॉ.राजेंद्र फडके, केतकी पाटील, राष्ट्रवादी कॉग्रस अजीत पवार गटाचे उमेश नेमाडे, उमेदवार अमोल जावळे, भाजपा तालुका अध्यक्ष जयश्री चौधरी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष योगिता घोडके, शिवसेना तालुकाध्यक्ष पुजा पाटील, मिनाताई तडवी, जयश्री जावळे, रविंद्र नाना पाटील, यावलच्या माजी नगराध्यक्ष माधुरी फेगडे,रोहिणी फेगडे, पुनम पाटील,भारती पाटील, रावेर तालुकाध्यक्ष शिवसेना स्वाती भंगाळे, आशा सपकाळे सह महायुतीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. या सभेत यावल शहर व तालुक्यातून हजारोंच्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.
महिलांसाठी सक्षमीकरण योजना. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचे प्रश्न हे जातीने सोडवले.

यात प्रामुख्याने उघड्यावर शौचालयास जाणार्‍या महिलांना सन्मानाने शौचालयाची उपलब्ध करून दिले जे काम काँग्रेसचे 70 वर्षात केले नाही ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले तसेच महिला सक्षमीकरण साठी राज्याचे महायुती सरकार देखील काम करत आहे जयश्री सोनवणे यांनी सांगीतले. या सरकारने विविध आरोग्याच्या योजना सुरू केल्या. यावल शहर व मतदार संघाचा विकास. शहरातच्या पाणीपुरवठा योजनेसाठीचा निधी मंजूर करून आणला आहे.

शेळगाव बॅरेज प्रकल्प हा शेतकर्‍यांसाठी वरदान ठरला आहे. आपली स्वच्छ प्रतिमा असून माझ्या विरोधात विरोधकांकडे काहीही नाही म्हणून आगामी काळात कदाचित ते माझ्यावर काहीही चिखल फेक करू शकतात असे अमोल जावळे यांनी संवाद साधताना सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या