ठाणगाव / खोकरविहीर | वार्ताहर
सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे येथे दि. ३ सप्टेंबर रोजी दारूबंदीचा (Prohibition of Alcohol) ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु, अवैध दारू विक्रेते या ठरावाला जुमानत नसल्याने आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील जवळपास एक हजार महिला रविवारी (दि.८) बा-हे पोलिस ठाण्यावर महिलांनी आंबोडे ते पोलीस ठाणे बाऱ्हे १० किमी पायी मोर्चा काढून घोषणांनी बाऱ्हे परिसर दणाणून सोडले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : मनी लॉन्ड्रिंगच्या धाकाने गमावले सात काेटी; अटकेची दाखविली भिती
दारुबंदीसाठी सहायक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे यांना स्वयंम सहाय्यता महिला बचत गटाच्या (Women’s Self-Help Group) वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सरपंच राजेंद्र निकुळे, मंदाकिनी भोये, भामा जाधव, कमल पाडवी, मनिषा भोंडवे, सुगंधा गारे, जिजा महाले, चंद्राबाई ठाकरे, पुष्पा पाडवी, राधा जाधव, गुणवंता बारे, योगिता चौधरी यांच्यासह स्वयंम सहाय्यता महिला बचत गटातील हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
हे देखील वाचा : नाशिक जिल्ह्यातील ‘इतक्या’ उमेदवारांना शासनाच्या ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार रोजगार
बा-हे पोलिस ठाणे हद्दीत दारू विक्री किंवा निर्मिती करताना आढळल्यास आम्ही दोषी विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
सोपान राखोंडे, सहायक पोलिस निरीक्षक, बा-हे
आंबोडे ग्रामपंचायती मध्ये ३ सप्टेंबर रोजी दारुबंदीचा ठराव मंजूर करून ही दारू विक्रेते जुमानत नसल्याने आज स्वयंम सहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी पुढाकार घेत बा-हे पोलीस ठाण्यात धाव घेऊन निवेदन देण्यात आले आहे.
मंदाकिनी भोये, माजी सभापती
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा