चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
एसटी बस (s t bus) मध्ये बसलेल्या मालेगावच्या (Malegaon) महिला प्रवाशीच्या हातातील तीन महिलांनी पर्स हिसकवली व पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, फिर्यादी महिला व दोन-तीन प्रवाशांनी त्या तिघा महिलांना पकडून पोलिसांच्या (police) स्वाधीन केले आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव येथील आशा समाधान चौधरी व त्यांची आई मीराबाई ह्या दोन्ही चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील नातेवाईक यांचेकडे शनिवारी सकाळी आले होते.दुपारी दीड वाजेच्या सुमारास परत चाळीसगाव मार्गे मालेगाव येथे जाण्यासाठी एसटी बसने निघाल्या.बस मध्ये गर्दी असल्याने त्या दोन्ही प्रवाशी बसच्या गेट जवळ उभे होते.बस ही खरजई नाक्याजवळ येवून थांबली असता बस मध्ये बसलेल्या तीन अनोळखी महिला बस मागून आल्या. त्यांच्या पैकी दोन महिलांच्या हातात लहान बाळ होते.
त्यांनी फिर्यादी आशा चौधरी यांना जोरात धक्का देवून त्यांचे लक्ष विचलीत केले.लगेच तिसऱ्या महिलेने त्यांच्या हातातील छोटी पर्स बळजबरीने हिसकावून घेवून त्या तीन ही महिला खरजई नाका येथे बस मधून खाली उतरला.बस थांबलेली असल्याने आशाबाई व त्यांच्या आई बस मधील इतर दोन ते तीन लोक असे त्यांच्या मागे खाली उतरून त्या तीन महिलांच्या पाठलाग करून त्यांना पकडले.त्या नंतर पोलिसांच्या त्या महिलांना स्वाधीन करून त्यांच्या विरोधात तक्रार दिली.त्या पर्स मध्ये सोन्याचे मणी,मंगळसूत्र व एक हजार रुपये असा ऐवज होता. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीसोलीस करीत आहे