Tuesday, June 25, 2024
Homeदेश विदेशWomen Reservation Bill 2023 : विधेयकाला पाठिंबा देताना काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; भाजपचे खासदार...

Women Reservation Bill 2023 : विधेयकाला पाठिंबा देताना काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; भाजपचे खासदार म्हणाले…

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

महिला आरक्षण विधेयकावरून (Women Reservation Bill) लोकसभेत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली. या विधेयकाला पाठिंबा देतानाच, सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) विधेयक आणण्यास होत असलेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी (BJP MP Nishikant Dube) जोरदार पलटवार केला.

भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले, सुषमा स्वराज आणि गीता मुखर्जी यांनी या महिला आरक्षणाविरोधात सर्वाधिक आवाज उठवला आणि सोनिया गांधी यांनी या दोन महिलांचे नावही घेतले नाही. तुमच्या सरकारने आणले असे तुम्ही म्हणता. हे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले विधेयक आहे.

नव्या संसद भवनात प्रफुल्ल पटेल अन् शरद पवारांची भेट; संजय राऊत म्हणाले,…

आम्ही विधेयक आणले तर, काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलेय, असा टोला भाजप खासदार दुबे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशातील महिलांना सन्मान दिला. हा देश संविधानावर चालतो.

आताच सोनिया गांधी म्हणाल्या की, हे विधेयक लवकरात लवकर लागू केला पाहिजे. पण राज्यसभेत कोणतेही आरक्षण नसेल. मग कसे आरक्षण देता येईल? तुम्ही लॉलीपॉपसारखे हे विधेयक फिरवत राहिलात, असा टोला दुबे यांनी लगावला. खरे तर हे विधेयक राजीव गांधींचे स्वप्न असून काँग्रेसने हे विधेयक आणल्याचे सोनिया गांधी यांनी लोकसभेत सांगितले. यावरही दुबे यांनी प्रत्युत्तर दिले.

Parliament Special Session : महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसकडून समर्थन; सोनिया गांधी म्हणाल्या…

खासदार दुबे म्हणाले, “आमच्याकडे असे पंतप्रधान आहेत जे म्हणतात की मी जे काही सुरू करतो ते मी संपवतो. जर हे महिला आरक्षण विधेयक इथे आले तर महिलांना आरक्षण मिळेल आणि एकत्र राहून मदत करतील, कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. हे लोक पुन्हा देशात चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी जनगणना होईल आणि मग महिलांना आरक्षण मिळेल, असेही दुबे म्हणाले.

काय म्हणाल्या सोनिया गांधी?

महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना सोनिया गांधींनी होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या १३ वर्षांपासून महिला आपल्यावरील जबाबदारीच्या प्रतीक्षेत आहेत. महिलांना या विधेयकासाठी किती काळ वाट पाहावी लागणार आहे? हा महिलांवर अन्याय आहे, असं सोनिया म्हणाल्या. सर्व अडथळे दूर करून हे विधेयक अंमलात आणावे. हे विधेयक तात्काळ लागू करावे. परंतु, जातनिहाय जनगणना, एससी, एसटी, ओबीसी महिलांना आरक्षणात स्थान दिले जावे, असेही त्या म्हणाल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या