नवी दिल्ली -New Delhi
बीसीसीआयने 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान शारजाहमध्ये होणार्या महिला टी-20 चॅलेंजचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी महिला खेळाडू दुबईला पोहोचल्या असून त्या सहा दिवसांसाठी क्वारंटाइन आहेत.
महिलांच्या टी-20 चॅलेंजचा अंतिम सामना 9 नोव्हेंबरला होणार आहे. संघ सुपरनोव्हाज, व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स एकमेकांशी एकदा सामना खेळतील. त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएलच्या प्लेऑॅफचे सामने दुबई आणि अबुधाबी येथे खेळले जातील. तर महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा शारजाह येथे खेळवली जाईल.
महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा –
4 नोव्हेंबर, सुपरनोव्हाज वि. व्हेलोसिटी (सायं. 7.30 वा.) 5 नोव्हेंबर, व्हेलोसिटी वि. ट्रेलब्लेझर्स (दु. 3.30 वा.) 7 नोव्हेंबर, सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स (सायं. 7.30 वा.) 9 नोव्हेंबर, अंतिम सामना (सायं. 7.30 वा.)
महिला टी-20 चॅलेंजचे संघ
सुपरनोवास (Supernova) : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमीमाह रॉड्रिग्स, चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया, शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, आयुषी सोनी, आयबोंगा खाका, मुस्कान मलिक.
ट्रेलब्लेझर (Trailblazers) : स्मृती मंधाना (कॅप्टन), दीप्ती शर्मा, पुनम राऊत, रिचा घोष, डी हेमलथा, नुजत परविन, राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी एक्लेस्टोन, नाथकन चांथम, डिएंड्रा डॉटिन, काश्वी गौतम.
वेलोसिटी (Velocity) : मिताली राज (कॅप्टन), शाफाली वर्मा, वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा, एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य,सुश्री दिव्यदर्शिनी, मनाली दक्षिणी, लेघ कासपेरेक, डेनियल व्याट, सुने ल्यूस, जहानारा आलम, एम अनघा.