Saturday, October 5, 2024
Homeक्रीडाWomens T20 World Cup 2024 : जिंकणारा संघ होणार मालामाल; ICC ची...

Womens T20 World Cup 2024 : जिंकणारा संघ होणार मालामाल; ICC ची मोठी घोषणा

नवी दिल्ली | New Delhi

महिला टी-20 वर्ल्डकप 2024 चा (Womens T20 World Cup 2024) सामने 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यापुर्वी आयसीसीने महिला वर्ल्डकपच्या (ICC Womes World Cup) यजमानपदाची जबाबदारी बांगलादेशला (Bangladesh) दिली होती. परंतु राजकीय संकटामुळे 2024 च्या वर्ल्डकपच्या यजमानपदाची जबाबदारी युएई (UAE) ला दिली आहे. पहिला सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे. पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड (Scotland) यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तर भारतीय महिला संघ 4 ऑक्टोबरला पहिला सामना खेळणार आहे.

- Advertisement -

मात्र, यादरम्यान आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने चॅम्पियन संघ आणि उपविजेता संघाला किती रक्कम मिळणार हे जाहीर केले आहे. पूर्वीच्या तुलनेत बक्षीस रकमेत 225 टक्के वाढ झाली आहे. आयसीसीने जेतेपद पटकावणार्‍या संघाला 2 लाख 34 हजार अमेरिकन डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. तर उपविजेत्या संघाला 1 लाख 70 हजार डॉलर्स मिळणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीत पोहोचणार्‍या संघाला 6 लाख 75 हजार अमेरिकन डॉलर्स मिळतील. ग्रुप स्टेजमध्ये सहभागी होणार्‍या संघाला 31 हजार 154 डॉलर्स मिळतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या