महिला टी 20 विश्वचषक पुढील वर्षी म्हणजेच 2026 ची तारीख (Women’s T20 World Cup 2026) अखेर जाहीर झाली आहे. याबाबत आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित करायची याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. परंतु अंतिम सामन्याबाबत परिस्थिती स्पष्ट नव्हती, परंतु आता आयसीसीनेही त्याची घोषणा केली आहे. आज गुरुवारी 1 मे रोजी लॉर्ड्स येथे झालेल्या कार्यक्रमात ठिकाणे आणि तारखांची घोषणा करण्यात आली. चॅम्पियनशिपमध्ये 24 दिवसांत 33 सामने खेळवले जातील. पुढील वर्षी होणार्या महिला टी-20 वर्ल्ड कपचा (Women’s T20 World Cup 2026) अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे, असे आयसीसीने (ICC) जाहीर केले आहे. त्याचे यजमानपद इंग्लंडकडे आहे.
विशेष म्हणजे, आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळण्याची ही सलग तिसरी वेळ असणार आहे. ही स्पर्धा 12 जूनपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना 5 जुलै रोजी लंडनमधील प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन, साउथहॅम्प्टनमधील हॅम्पशायर बाउल, लीड्समधील हेडिंग्ले, मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड, लंडनमधील केनिंग्टन ओव्हल आणि ब्रिस्टलमधील काउंटी ग्राउंड आणि इतर ठिकाणी ही स्पर्धा होईल. ज्यामध्ये 12 संघ असतील. भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी महिला टी-20 विश्वचषकात आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. इतर संघांची निवड पात्रता फेरीतून केली जाईल.
विशेष म्हणजे याआधी गेल्या तीन वेळा जेव्हा जेव्हा आयसीसी स्पर्धेचा (ICC) अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला गेला तेव्हा तेव्हा इंग्लंडचा संघ (England Team) चॅम्पियन बनला. 2017 मध्ये, महिला एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला गेला, त्यानंतर इंग्लंडचा संघ चॅम्पियन बनला. 2019 मध्ये, जेव्हा पुरुषांच्या एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना येथे खेळला गेला, तेव्हाही इंग्लंडचा संघ चॅम्पियन बनला. अशा परिस्थितीत, पुढील वर्षी होणार्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) इंग्लंडचा संघ पुन्हा विजेता बनेल का हे पाहणे खूप मनोरंजक असेल.