Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशघटनेच्या उद्देशिकेतून धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे शब्द वगळले; अधिवेशनादरम्यान गोंधळ

घटनेच्या उद्देशिकेतून धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे शब्द वगळले; अधिवेशनादरम्यान गोंधळ

नवी दिल्ली | New Delhi

नव्या संसद भवनात कालपासून (New Loksabha) कामकाजाला सुरुवात झाली, यावेळी सर्व खासदारांना संविधानाची प्रतींचे (Preamble Of Constitution) वाटप करण्यात आले. मात्र, आता यावरुन ही नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) संविधानाच्या नवीन प्रतच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी’ ‘धर्मनिरपेक्ष'(Secular, Socialist Words) असा शब्द नसल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

या उद्देशिकेचे फोटो देखील विरोधकांनी ट्विट केले आहेत. मुळात, घटनेतील उद्देशिकेतील पहिल्या ओळीत भारताचे वर्णन हे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाहीवादी असे करण्यात आले आहे. मात्र तृणमूलच्या दाव्यानुसार धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द वगळण्यात आले आहेत. आता यावर केंद्र सरकार स्पष्टीकरण देणार का ते पाहावे लागेल.

India vs Canada: कॅनडाकडून ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी आरोप केला की, नव्या संसदेतील कामकाजाच्या पहिल्या दिवशी संविधानाच्या नव्या प्रतींचे वाटप करण्यात आले. पण या संविधानाच्या सरनाम्यात सेक्युलर (धर्मनिरपेक्ष), सोशलिस्ट (समाजवादी) हे शब्द नाहीत. जर हे दोन शब्द संविधानात नसतील तर ही गंभीर बाब आहे.

पुढे त्यांनी आरोप केला की, सरकारने हा बदल खूपच हुशारीने केला आहे, म्हणूनच त्यांचा हेतू हा अडचणी निर्माण करणारा आहे. मला हा मुद्दा संसदेत उपस्थित करायचा होता, पण मला याची संधी दिली गेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाने प्रत्युत्तर दिले असून कायदा मंत्री अर्जुन मेघवाल म्हणाले की,राज्यघटनेची मूळ प्रत देण्यात आली आहे. या संदर्भात काल उत्तरही देण्यात आले आहे. दरम्यान, भाजपच्या खासदार रिटा बहुगुणा जोशी म्हणाल्या, हा मुद्दा बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, भाजपचा संविधानावर अढळ विश्वास आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या