Friday, June 14, 2024
Homeनाशिककेमिकलच्या टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू

केमिकलच्या टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू

नाशिक | Nashik

- Advertisement -

केमिकलची टाकी साफ करताना गुदमरून एकाचा मृत्यू झाल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंनीमध्ये घडली…

केमिकल मुळे हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुंजाभाऊ साहेबराव वंजारी (४०, रा. पांडव नगरी, इंदिरानगर) असे या घटनेत मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वंजारी हे कंपनीतील केमिकलची टाकी साफ करत होते. यावेळी वापरण्यात आलेल्या केमीकलमुळे विषारी वायू तयार झाल्यामुळे त्यांच्या शरीरात विपरीत परिणाम झाला. त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या