Sunday, February 8, 2026
HomeनगरAkole : डोक्यात दगड पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Akole : डोक्यात दगड पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

कोतूळ |वार्ताहर| Kotul

जिलेटिनच्या स्फोटात उडालेला दगड डोक्यात पडून कोपरगाव तालुक्यातील एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पांगरी (ता. अकोले) येथे शनिवारी (दि.7) दुपारी घडली आहे. नितीन धोंडीराव थोरात (वय 37, रा. रांजणगाव, ता. कोपरगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे.

- Advertisement -

पांगरी शिवारातील त्र्यंबक दगडू काळे यांनी आपले बंधूं सुकदेव डोंगरे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम राहुरी तालुक्यातील आढाव नावाच्या ठेकेदाराला दिले होते. एलआर पोकलन मशिनच्या साहाय्याने विहिरीचे काम आठ दिवसांपासून सुरू होते. जिलेटिनचा स्फोट घडवून विहिरीतील खोदकाम चालू होते. दरम्यान, शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास जिलेटिनचा स्फोट घडवून आणला.

YouTube video player

यावेळी स्फोटाच्या दणक्याने दूरवर थांबलेल्या कामगाराच्या डोक्यात दगड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कामगाराला कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र, जिलेटिन व्यावसायिकांकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे.

ताज्या बातम्या

Jamkhed : जामखेडमध्ये नृत्यांगनेवर कोयत्याने वार

0
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed तु माझ्याशी फोनवर बोलत का नाही? माझा नंबर का ब्लॉक केला? असे म्हणत एकाने नृत्यांगनेेवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात महिला गंभीर...