Friday, May 3, 2024
Homeनाशिकइमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यु

इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यु

नाशिक |Nashik

सेंट्रींग काम करीत असतांना इमारतीवरून पडल्याने 34 वर्षीय कामगाराचा मृत्यु झाला. ही घटना हिरावाडी परिसरात घडली.

- Advertisement -

रामकिशोर बेनीमाधव यादव असे मृत कामगाराचे नाव आहे. यादव शुक्रवारी (दि.1) हिरावाडीतील गोकुळधाम सोसायटी या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करीत असतांना ही घटना घडली.

सेंट्रीगचे काम करीत असतांना अचानक तो जमिनीवर कोसळला. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने अमृतलाल यादव यांनी जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या