Wednesday, May 22, 2024
Homeनगरकामगारांनीच केली ज्वेलरीची चोरी

कामगारांनीच केली ज्वेलरीची चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कापड बाजारातील मोची गल्ली येथील दुकानातील पाच कामगारांनीच तीन लाख रुपये किमतीची ज्वेलरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरी करणार्‍या त्या पाच कामगारांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने पाचही संशयित आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

पप्पू पारधे (रामवाडी), आरबाज शेख (आलमगीर), रोहन कोंडके (नेप्ती नाका), निखील भिंगारे, आकाश लावंडे (दोघे रा. मंगलगेट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोचीगल्लीतील कॉस्मेटीक शॉपमधून इमिटेशन ज्वेलरी चोरी गेल्याची फिर्याद प्रकाश सचदेव यांनी दिली होती. गुन्ह्याचा तपास करत असताना दुकानातील कामगारांनीच ही ज्वेलरी चोरी केल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. पाचही कामगारांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार वंदना काळे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या