Saturday, May 17, 2025
Homeक्राईमकामगाराने चोरले साडेपाच लाखांचे साहित्य

कामगाराने चोरले साडेपाच लाखांचे साहित्य

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

नगर- दौंड रस्त्यावरील हनुमान नगर समोर असलेल्या एस. आर. कन्स्ट्रक्शनच्या साईटवरून प्लंबिंगचे काम करणार्‍या कामगाराने पाच लाख 55 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित आप्पासाहेब दिवटे (वय 44 रा. बागरोजी हाडको, दिल्लीगेट) यांनी फिर्याद दिली आहे.
सुरज शिवाजी शिंदे (वय 30 रा. बुरूडगाव रस्ता, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. सदरची घटना जून 2024 ते ऑगस्ट 2024 दरम्यान घडली आहे.

दिवटे यांच्या एस. आर. कन्स्ट्रक्शनचे नगर- दौंड रस्त्यावरील हनुमान नगर येथे प्लबिंगचे साहित्य ठेवलेले होते. दरम्यान, दिवटे यांच्याकडे सुरज शिंदे हा प्लबिंगचे काम करत होता. दिवटे यांनी आणलेले फ्रिवॉल, चैन रोलर, स्लुसवॉल, एअरवॉल, डिआयटी रिड्युसर, सॅडल पिस असे एकुण पाच लाख 55 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरीला गेले. सदरचे साहित्य सुरज शिंदे याने जून ते ऑगस्ट 2024 दरम्यान चोरले असून ते घासगल्ली येथील एका दुकानदाराला विक्री केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदरचा प्रकार दिवटे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सुरज शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. सुरज शिंदे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस अंमलदार वाघमारे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

छगन

Chhagan Bhujbal: मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या तोतया...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिकचे माजी पालकमंत्री आणि माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री आमदार छगन भुजबळ यांना आयकर अधिकारी असल्याचे सांगून छगन भुजबळ यांचे स्विय सहाय्यक...