Monday, March 31, 2025
Homeनंदुरबारकामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन-पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन-पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

शहादा । ता.प्र. nandurbar

मध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगारांना कामांच्या ठिकाणी भोजन मिळणार असल्याने ही योजना कामगारांसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित (Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit) यांनी केले.

- Advertisement -

शासन आपल्या दारी मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ वितरण पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते आज शहादा तालुक्यातील मुबारकपूर, तलवाडे, मळकाणी, फत्तेपूर या गावांत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, सरपंच मोहन ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना सुरू केल्या त्या योजना पैकी मुख्य योजना म्हणजे मध्यान्ह भोजन योजना होय, त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, अपघाती मृत्यू, नैसर्गिक मृत्यू, तसेच कामगाराच्या मुलांसाठी शिक्षण खर्च, लग्नासाठी 30 हजार आर्थिक मदत, घरे बांधण्यासाठी तसेच हत्यारे अवजारे खरेदी करण्यासाठी 5 हजाराचे अर्थसहाय्य, गृहोपयोगी वस्तु संच, सुरक्षा संच देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. येत्या काळात आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्ज तसेच इतर विविध योजनेचा लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांचे ड यादीत नाव नसलेल्या तसेच ज्या लोकांना घर नाही अशा पात्र व्यक्तिंना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार आहे. कामगारांनी आपल्या मुलांना उच्च व चांगले शिक्षण देण्यासाठी नियमित शाळेत पाठवावेत जेणे करून ते उच्चशिक्षित होतील असे त्यांनी सांगितले. मध्यान्ह भोजन योजनेत कामगारांना दोन वेळा जेवणात रोटी, दोन भाजी, डाळ, भात व इतर पदार्थांचा देण्यात येईल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत आहेर यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

यंदा भरपूर पाऊस, अन्नधान्यही मुबलक

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडून...