Tuesday, December 10, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा परिषदेत फायलींच्या प्रवासाची होणार नोंद

जिल्हा परिषदेत फायलींच्या प्रवासाची होणार नोंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेचे ( Zilla Parishad Nashik ) कामकाज गतिमान करण्याबरोबरच फायलींचा प्रवास कमी व्हावा, यासाठी 1 सप्टेंबरपासून लेटर अ‍ॅण्ड फाईल मॅनेजमेंट सिस्टिम (Letter and File Management System)लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

या पद्धतीमुळे फाईल ट्रेकिंग करणे सोपे होणार आहे. आवक-जावक नोंद करणार्‍या लिपिकाकडे दररोज सुमारे 150 फाईल्स नोंदीसाठी येतात.त्यामुळे या लिपिकाचा नोंदी करण्यासाठी लागणारा दिवसाचा वेळ वाचणार आहे, असे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले.

जिल्हा परिषद म्हटले की फाईलचा प्रवास नेहमीच चर्चेचा विषय ठरत आलेला असून या मुद्यावरून सभा, बैठकांमध्ये चर्चाही झालेल्या आहेत. एका फाईलचा तब्बल 40 टेबलांवरून प्रवास होतो. ती फिरताना विनाकारण फाईल अडवण्याचा प्रकार घडतो. याबाबत ओरड सदस्यांकडून वारंवार करण्यात येत होती.

आवक-जावक नोंद ठेवणार्‍या लिपिकाकडे दररोज साधारणपणे 150 फाईल्स येतात.एक फाईल पाच ते सहा वेळा नोंदणीसाठी येते. प्रत्येकवेळी तिची नोंद संबंधित लिपिकाला रजिस्टरमध्ये घ्यावी लागते. त्यांच्यातील कामकाजाची क्षमता व कामासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सीईओ बनसोड यांनी फायलींचा प्रवास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका फाईलसाठी एक मिनीट जरी वेळ पकडला तरी 150 फाईल्ससाठी 750 मिनिटे लागतात. याचाच अर्थ एका सेवकाचा 12 तासांचा वेळ जातो. आता नवीन पद्धतीमुळे वेळेची बचत होतानाच कामकाजही गतिमान होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी दिली.

.एक-एक मिनिटाचा लागणार हिशेब

लेटर अ‍ॅण्ड फाईल मॅनेजमेंट सिस्टिमचे काम अंतिम टप्प्यात आल्याने प्रत्यक्षात 1 सप्टेंबरपासून कामकाज सुरू होईल. या पद्धतीमुळे फाईल कोणत्या टेबलवर केव्हा पोहोचली, ज्यांच्याकडे पोहोचली त्यांनी केव्हा ती स्वीकारली, याची संपूर्ण माहिती या नवीन पद्धतीमुळे मिळणार आहे.

लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या