Wednesday, May 22, 2024
Homeनाशिक‘रोटरी’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

‘रोटरी’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

नाशिक:

रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेपसिटीच्यावतीने सेंट जोसेफ किलबिल हायस्कूल, सावित्रीबाई फुले विद्यालय व शासकीय कन्या विद्यालय या तीन शाळांमध्ये मुल व मुलांकरिता रोटरी इंटररँक्ट क्लब चालविण्यात येत असून विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम चालविले जातात.

- Advertisement -

उडान या संस्थेच्या सहकार्याने रोटरी क्लबच्यावतीने नुकतेच या तिन्ही शाळांतील निवडक विद्यार्थ्यां करिता वर्कशॉप घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्णर रोटे दादा देशमुख उपस्थित होते.

उडानच्यावतीने स्वाँडन सुप्रिया चित्रे व त्यांचे सहयोगी अपूर्वा रहाळकर, योगिता शेवाळे, मुग्धा जोशी व पृहा जोशी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना “स्वत:ला समजून घेणे,” “भावनांना समजून घेणे,” “अंतर वैक्तिक मानवी संबंध” व “समूहाची गतिशीलता” तसेच “स्वत:वर विश्वास ठेवणे” अशा अनेक विषयांवर ट्रेनिंग देण्यात आले. दिवसभर चाललेल्या कार्यशाळेतून मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उत्तम माहिती मिळाली. या कार्यशाळेमध्ये ५६ मुलांनी सहभाग घेतला.

या कार्यशाळेस रोटे. अच्यामा अलूर, रोटे. दुर्गा साळी, रोटे. मीना जैन, रोटे. दिल्पाल राणा, रोटे. अँन मेजर पिल्लेय, रोटे/ आभा पिंपरीकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची संकल्पना व त्याच्या यशस्वीकरिता रोटरी क्लबच्या संचालिका विभा घावरे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना या कार्यक्रमाकरिता रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०च्या चेअरपर्सन मेडिकल रोटे. आशा वेणुगोपाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी स्वर्णलता तारावाला, आशिष निकम व यश सराफ यांनी देखील परिश्रम घेतले.

फ्रावशी इंटरनशँनल या शाळेने त्यांचे अद्यावत सर्व सोयीयुक्त असे सभागृह तसेच मुलांच्या नाश्ता व जेवण्याची व्यवस्था आणि जाण्याकरिता बसेस उपलब्ध करून दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या