Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक एड्स दिनविशेष : घरच्यांची साथ नसली तरी परक्यांची असू द्या

जागतिक एड्स दिनविशेष : घरच्यांची साथ नसली तरी परक्यांची असू द्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एचआयव्हीने ( HIV) मातृपितृ छत्र हरपल्याने अक्षरश: पोरकी झालेली स्नेहा (नाव बदलले आहे) आता संगणकात तरबेज झाली आहे. स्वळावर तर उभी राहिलीच मात्र आपल्यास सारख्या इतर अभागी भगिनींच्या पंखातही तेढेच बळ भरण्यासाठी ती पुढाकर घेऊ लागली आहे. घरच्यांची साथ हिरावली तर, परक्यांची साथ असू दे,अशीच प्रार्थना ती देवाला करत करत आहे.

- Advertisement -

30 जुलै 21 रोजी ऐन करोनाच्या काळात काळ्याकुट्ट रात्री दोनच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील स्नेहा चाईल्ड लाईन टीम व पोलिसांसमवेत सर्वप्रथम नगरच्या स्नेहालयात अतिशय केविलवाण्या अवस्थेत आली होती. पहिली ओळख बेबीताईशी झाली. स्नेहालयात पोलीस सोडून गेल्यानंतर ती खूप रडली. शिक्षणाची इच्छा अजिबात नव्हती. मात्र बेबीताईने शिक्षणासाठी व पुनर्वसन करण्यासाठी स्नेहालय तुझी मदत करेल असे खूप वेळा समजावून सांगितले. तेथील वागणुकीने स्नेहाचे दुःख दुर झाले. तिला चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. पण त्या शाळेत गेल्यानंतर स्नेहा एकटीच राहायचीे. अजिबात करमत नव्हते. तिने चौथीतच शाळा सोडली होती. पण शिकण्याची खूप आवड होती. हस्ताक्षरही खूप चांगले होते. तिने समाधान सरांशी शाळेत जाण्याचा विषय काढला आणि दहा दिवसातच दहावीत राघवेंद्र स्वामी विद्यालय, बोल्हेगाव शाळेत प्रवेश झाला.

वडिलांसमान डॉ. राजकुमार भारूका यांनी दहावीची पुस्तके दिली. एआरटी गोळी चालू असल्याने शाळेत गेल्यानंतर खूप ऊन लागले की त्वचेला त्रास व्हायचा. पूर्ण शरीराची आग व्हायची. कोणाला सांगावे कळत नव्हतें. शेवटी मॅडमला सांगितले. त्यांनी ताबडतोब त्वचा रोग तज्ञांना दाखविले. दहावीचे वर्ष असताना नवीन शाळेत या त्रासामुळे अभ्यास होतो की नाही याची भीती वाटत होती. तरीही मन लावून अभ्यास केला. गणित आणि इंग्लिश फारसे जमत नव्हते. दरम्यान, करोनाचे प्रमाण वाढल्यामुळे शाळेला सुट्ट्या लागल्या. हळूहळू इंग्लिश बोलायला शिकलीे. े सर्वजण लक्ष देत होते.

एकटेपणा दूर झाला, जिवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या. तरीही रविवारी सर्वांचे पालक मुलांना भेटण्यासाठी येत त्यादिवशी आपले पालक नाही म्हणून खूप दुःखी व्हायची. नातेवाईक साधा फोनही करत नव्हते. अशा परिस्थितीत तिने दहावी परीक्षा दिली. शेवटी दहावीचा निकाल लागला. स्नेहाला 76.40% गुण मिळाले. सगळे खूप खुश झाले. जीवनात काही समस्या येतात. मात्र, त्यावर समाजातील काही संंस्था, व्यक्ती देवा सारख्या धावून येतात. त्यामुळे निराश न होता पुढे चालत राहावे, हेच स्नेहाने दाखवून दिले.

त्याला जीम ट्रेनर व्हायचेय

एकेकाळी भिकेला लागलेला संतोष आता जीम ट्रेनर होऊ पाहत आहे. असहाय्य झाल्याने घर सोडुन गेलेला मयूर शेलार आता एका शाळेत काम करत आहे. घरच्यांची साथ नसली तरी परक्यांची साथ कायम मिळू दे म्हणणारी स्नेहा संगणक क्षेत्रात तरबेज होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहे. एचआयव्ही सारख्या दुर्धर आजारावर मात करुन तिघांनी समाज समोर एक आदर्श तर निर्माण केलाच, परतु इतरांना जगण्याचे बळ देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. आज जागतिक एड्स दिनानिमित्त या तिघांच्या सत्यकथा इतरांंना कायम प्रेरणादायी ठरणार आहेत.

शरीरात एचआयव्हीच्या विषाणूची संख्या वाढल्यामुळे संतोषची प्रतिकारशक्ती कमी झाली. त्याचे गावाकडे कोणीही नव्हते. त्याचे वडिलांच्या निधनानंतर तो भीक मागून खात होता. त्यातच तो एचायव्ही असल्याचे समजताच लोकांनी भीक देणेहीे बंद केले.त्यामुळे तो अन्नालाही परका झाला होता. मात्र आता तोच तरुण भविष्यात जिम ट्रेनर बनून चांगला सदूउपयोग करीन म्हणत आहे. साडे सतरा वर्षाचा तरुण मुलगा खूप कुपोषित होता. तो चालताना पडतो की काय असे वाटत होते. नातेवाईकांंनी तो एचआयव्ही बाधित असल्याचे सांगीतले.

त्याच्या शरीरात एचआयव्हीच्या विषाणूची संख्या वाढली होती. त्यामुळे प्रतिकारशक्ती क्षीण झाली होती. तो स्नेहालयात दाखल झाला. त्याचे वजन फक्त 18 किलो भरले. जेवढे वय तेवढेच वजन होते. त्यानंतर त्यास अभिजीत वांडेकर यांनी तपासले. तो बालक कुपोषित व विविध आजाराने ग्रासलेला असल्याने वांडेकरांंनी त्यास वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी परजणेंंकडे पाठवलेे. परजणेंनी त्यास तपासले असता त्याला दम्याचा त्रास असल्याचे लक्षात आले.ज्या मुलाला अशक्तपणामुळे चालताना देखील त्रास होत होता. तो मुलगा जिममध्ये जाऊन जिम करत होता आणि भविष्यात त्याला इतर मुलांना जिम शिकवण्यासाठी जिम ट्रेनर व्हायचे आहे हे त्यांनी आत्ताच ठरवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या