Saturday, May 4, 2024
HomeनाशिकWorld Anti-Drug Day : नाशिक पोलिसांकडून सायकल रॅलीद्वारे जनजागृती; पाहा व्हिडीओ...

World Anti-Drug Day : नाशिक पोलिसांकडून सायकल रॅलीद्वारे जनजागृती; पाहा व्हिडीओ…

नाशिक | प्रातिनिधी | Nashik

आज जागतिक अंमली पदार्थविरोधीदिन (World Anti-Drug Day) साजरा होत आहे. अंमली पदार्थांचे घातक परिणाम समाजाला ठाऊक व्हावेत, समाजात जनजागृती व्हावी, यासाठी आज (दि. 26) सकाळी पोलीस आयुक्त कार्यालय आणि नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे (Cycle Rally) आयोजन करण्यात आले होते. गोल्फ क्लब येथून रॅलीला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली…

- Advertisement -

काय आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन

डिसेंबर १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केला. हा दिवस अंमली पदार्थांचे सेवन एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आयोग्यावर कसे दुष्परिणाम करते, यामुळे एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

हा दिवस पाळण्यामागे जगभरातील खासकरून लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी हा उद्देश असतो. जगभरातील शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणे आणि सार्वजनिक ठिकाणी या विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच ड्रग्ज आणि त्याच्या सेवनाच्या जोखमीविषयी माहिती देणारे कार्यक्रम जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनी आयोजित केले जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या