Thursday, June 13, 2024
Homeक्रीडाICC World Cup 2023 : ‘दिल जश्न बोले’! वर्ल्डकपचं Anthem रिलीज, रणवीर...

ICC World Cup 2023 : ‘दिल जश्न बोले’! वर्ल्डकपचं Anthem रिलीज, रणवीर अन् धनश्रीचा भन्नाट डान्स; पाहा Video

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात येत्या ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०११ नंतर १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात वर्ल्डकप स्पर्धेचे होत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे…

आयसीसीने यंदाच्या वर्षी खेळविण्यात येणाऱ्या आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचे नवीन अँथम सॉंग प्रदर्शित केले आहे. ‘दिल जश्न बोले’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा समावेश असून, त्याच्यासोबत भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंदर चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील सहभागी झाली आहे.

हे गाणे स्टार म्यूझिशियन नकाश अजीज, प्रीतम, श्रीरामचंद, अमित मिश्रा, जोनिता गांधी, अकासा आणि चरन यांनी गायले आहे. या गाण्यात अभिनेता रणवीर सिंगने मरून रंगाचा बलेझर, मॅचिंग टोपी, आणि नेव्ही ब्लू शर्ट परिधान केला आहे. आयसीसीने ट्विटरवर गाणे शेअर केलं आहे. गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

लालबागच्या राजाचरणी पहिल्याच दिवशी लाखोंचं दान! नोटांच्या माळा, सोन्याचे दागिने लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण

- Advertisment -

ताज्या बातम्या