दिल्ली | Delhi
इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्याने विश्वचषकाची जोरदार सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी पहिला सामना होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्युची लागण झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळण्याची शक्यता कमी आहे.
शुभमन गिलची डेंग्यू टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार केले जात आहेत. संघ व्यवस्थापन शुभमन गिलच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. शुक्रवारी त्याची आणखी एक टेस्ट केल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला जाईल. शुभमन गिल अनफिट असल्याने भारतीय संघाला वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा धक्का मानला जात आहे. आता त्याच्या खेळण्याबाबत शुक्रवारी निर्णय घेतला जाईल.
‘डीन’ला टॉयलेट साफ करायला लावणं पडलं महागात! खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा
शुबमन गिल याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याचा अलीकडील फॉर्म खूपच चांगला राहिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त शतक केले होते. त्याने 97 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या होत्या. यावर्षी शुबमनचे हे पाचवे शतक आहे. तसेच, एकूण त्याने सहा शतके झळकावली आहेत. यावरून समजते की, शुबमन सध्या किती चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
Crime News : पत्नीनेच केला पतीचा खून केला; भावाच्या मदतीने काढला काटा