Friday, May 24, 2024
Homeदेश विदेशकोरोना पेक्षाही घातक महामारी येण्याची शक्यता; WHO ने दिला इशारा

कोरोना पेक्षाही घातक महामारी येण्याची शक्यता; WHO ने दिला इशारा

नवी दिल्ली | New Delhi

दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना व्हायरसच्या (Covid-19) महामारी मधून अजून जग सावरू शकलेले नाही आहे. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, येत्या काळात अजून एक महामारी जगावर येऊ शकते. ज्यात तब्बल पाच कोटी लोकांना आपला जीव गमावा लागू शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेन अर्थात WHO ने या आजाराला डिजीज एक्स (Disease X) असे नाव दिले आहे.

- Advertisement -

WHO ने डिसिज एक्स हा आजार कोविड-१९ पेक्षा जास्त भयानक असल्याचे म्हटले आहे. या आजाराचा फैलाव झाल्यास जवळपास पाच कोटी लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यता आली आहे. या आजाराचा सामना करणे आव्हानात्मक असल्याचेही WHO ने म्हटले आहे.

…अन्यथा आम्ही लोकसभेच्या ४८ जागा लढवू; वंचितचा काँग्रेसला इशारा

डेली मेल यांच्या एका रिपोर्टनुसार कोविड-१९ ही फक्त एक सुरुवात आहे. येणाऱ्या महामारी मध्ये कमीत कमी पाच कोटी लोकांचा जीव घेऊ शकतो असा इशारा तज्ञांनी दिला आहे. तसेच, कोविड-१९ ही केवळ महामारीची सुरूवात आहे. जर या आजाराने महामारीचे रूप धारण केले, तर यामुळे किमान ५ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे ब्रिटनच्या व्हॅक्सिन टास्क फोर्सच्या प्रमुख केट बिंघम (KATE BINGHAM) यांनी म्हटले आहे.

१९१८-१९ मध्ये आलेल्या फ्लूमुळे जगातील पाच कोटीहून अधिक नागरिकांचा जीव गमवावा लागला होता. येणारी महामारी ही त्यापेक्षा घातक असू शकते असे ते म्हटले.

…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी; बच्चू कडू यांनी सांगितलं थेट कारण

डिजीज एक्स हा डिसीज नेमका काय आहे, याची कुणालाच कल्पना नाही. मात्र या आजाराची साथ संपूर्ण जगातील मानवजातीला संकटात टाकू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. हा आजार कोरोना पेक्षाही भयंकर, खतरनाक आणि प्राणघातक अशी ही डिजीज एक्सची साथ असेल. या महामारीमुळे पृथ्वीतलावरील मानवी अस्तित्व देखील नष्ट होण्याचा धोका संभवतो, अशी चर्चा आहे.

दरम्यान, WHO ने २०१८ मध्येच या आजाराचा इशारा दिला होता. शास्त्रज्ञांची टीम ज्या अज्ञात “डिसीज एक्स” वर चर्चा करतेय तो प्रत्यक्षात नवीन नाही. २०१८ मध्येही, एका अहवालात नमूद केलेय की, डिजीज X- आपल्या जगासाठी सर्वात मोठा संसर्गजन्य धोका बनू शकतो. त्यामुळे या रोगाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने आधीच इशारा दिला होता.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या