Sunday, December 15, 2024
Homeदेश विदेशG20 leaders at Rajghat : जगभरातील नेते राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक

G20 leaders at Rajghat : जगभरातील नेते राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक

नवी दिल्ली | New Delhi

येथे जी २० शिखर परिषद (G20 Summit) पार पडत असून आज या परिषदेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या कामकाजानंतर जगभरातून आलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आज रविवार (दि.१० सप्टेंबर) रोजी सकाळी राजघाटावर (Rajghat) जाऊन महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) आदरांजली वाहत त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले…

- Advertisement -

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह सर्व जी-२० नेत्यांचे शाल प्रदान करून राजघाटावर स्वागत केले. तर स्वागत स्थळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापूंच्या साबरमती आश्रमाच्या (Sabarmati Ashram) बापू कुटीबाबत सर्व देशांचे राष्ट्राध्यक्ष, निमंत्रित देशांचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांना माहिती दिली. ‘बापू कुटी’ हे महात्मा गांधींचे १९३६ ते १९४८ मध्ये मृत्यू (Death) होईपर्यंत निवासस्थान होते.

मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

तर सर्वात पहिले महात्मा गांधींच्या समाधीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएवा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी अभिवादन केले. यानंतर जी २० सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख आले. या वेळी जी २० देशांच्या नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली (Tribute) वाहत महात्मा गांधींचे आवडते भक्तिगीत ‘वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीड पराय जाने रे…’ हे गायल्याचे पाहायला मिळाले.

Nashik News : ठाकरे गटाला धक्का; बबनराव घोलप यांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा

तसेच पंतप्रधान मोदींनी ट्विटर करत म्हटले की, जी २० कुटुंबाने प्रतिष्ठित राजघाटावर शांतता, सेवा, करुणा आणि अहिंसेचे प्रतीक असलेल्या गांधींना श्रद्धांजली वाहिली. विविध राष्ट्रे एकत्र येत आले आहेत. गांधीजींचे सामंजस्यपूर्ण शाश्वत आदर्श, सर्वसमावेशक विचार समृद्ध जागतिक भविष्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

Video : नैताळेत आमरण उपोषणास सुरुवात; छत्रपती संभाजीराजेंनी दिली उपोषणस्थळी भेट

दरम्यान, आज रविवार (दि. १० सप्टेंबर) रोजी सकाळी दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) राजघाटावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह काही नेते अनवाणी चालले. तर काही नेत्यांनी पांढरे शूज घातलेले दिसले. तर जी २० शिखर परिषदेची दोन सत्रे संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (PM Rishi Sunak) यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यावसायिक संबंध मजबूत करण्याच्या आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील या भेटीमुळे मुक्त व्यापार कराराच्याही मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जी-२० परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत उपस्थिती; मोदींचे कौतुक ते ऋषी सुनक यांच्यासोबतच्या फोटोची चर्चा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या