Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक संग्रहालय दिन विशेष : नाशकात येताय तर ही संग्रहालये पाहाच!

जागतिक संग्रहालय दिन विशेष : नाशकात येताय तर ही संग्रहालये पाहाच!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकचा इतिहास आणि संस्कृती नाशिककरांनी संग्रहालयाच्या माध्यमातून टिकवून ठेवली आहे.प्रत्येकाला अभिमान वाटावा असा हा वारसा जपला आहे.जगभरात आज (दि.18) ‘जागतिक संग्रहालय दिन’ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आपणही आपल्या आप्तस्वकिंयांनी जपलेले संंग्रहालय या निमित्ताने पहावे ,इतराना दाखवावे हीच अपेक्षा आहे.

1977 सालापासून जगभरात 18 मे संंंग्रहालय दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने नाशिकच्या संंग्रहालयाची माहिती घेतली असता बराच मोठा संंग्रह नाशिककरांनी करुन ठेवल्याचे दिसत आहे.वस्तुसंग्रहालये म्हटले की, सरकारवाडा हे नाव सर्वप्रथम ओठावर येते. या शासकीय वस्तुसंग्रहालयात मूर्ती, प्राचीन शिल्प, नाणी, शस्त्रात्रे पहायला मिळतांत.सरकारवाड्याच्या अनोख्या इतिहासामुळे आणि शहराच्या मध्यभागी हे संंग्रहालय आल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचले आहे.

नाणी हा विषय तसा सर्वसामान्यांना व्यवहारापुरता असला तरी अंजनेरी येथील नाणे संशोधन केंद्राने उभारलेले नाणे संग्रहालय आशिया खंडातील एकमेव संशोधन केंद्र आहे. नाण्यांबाबत या संग्रहालयाने सर्वसामान्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण केली आहे. आवर्जून पहावे, असे हे संग्रहालय आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून ते नाणे संस्कृतीसह कला व कलेच्या बदलाचा आढावा या संग्रहालयात घेतला आहे.

वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

नाशिकचा प्राचीन इतिहास समृद्ध आहे. म्हसरूळ येथील चामर लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बेलोरकर गुरुजींच्या प्रयत्नांतून साकारलेले जैन मंदिर, विविध दुर्मिळ मूर्ती व शिल्पांनी सजलेले संग्रहालय, या संग्रहालयात चोवीस तीर्थंकरांच्या बारीक कलाकुसरीच्या मूर्ती, कच्च्या पाचूच्या दगडातील मूर्ती, कन्नड शिलालेखांसहितच्या दाक्षिणात्य मूर्ती, गारगोटीसारख्या दगडावरच्या मूर्ती, हस्तलिखिते, पोथ्या व ब्राँझ धातूच्या विविध मूर्ती आहेत. यासह नाशिकमधील आर्टिलरी वस्तू संग्रहालये, एचएलचे वस्तू संग्रहालय व एबीबी सर्कल येथील सोहम संग्रहालय लक्ष्यवेधी आहे.

जिल्हा हिवताप अधिकारी व दोन आरोग्य सेवक ‘एसीबी’च्या जाळ्यात

मविप्रचे शैक्षणिक संग्रहालय

1920 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पायाभरणी केलेल्या पंम्पिंग स्टेशन, गंगापूर रोडवरील उदोजी मराठा बोर्डिंग येथे संग्रहालय उभारले आहे. संस्थेच्या या संग्रहालयाद्वारे भारतीय शिक्षण प्रशिक्षण विकास, स्थानिक व ग्रामीण शाळांचा उदय व इतिहास, भारतीय शालेय इतिहासाची उत्क्रांती आणि शाळा प्रायोजक शैक्षणिक वारसा संपत्ती आदी विषयांवर वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शने भरविण्यात येतात. जगभरात एकूण आठ शैक्षणिक संग्रहालये आहेत. त्यापैकी वारसा (संस्कृती) आणि समकालीन महत्त्व यांचे प्रतिनिधीत्व करणारी फक्त दोनच संग्रहालये आहेत. मविप्र संस्थेने स्थापन केलेले जगातील हे तिसरे व भारतातील पहिलेच संग्रहालय आहे. हे एकदा तरी आपल्या मुलांना आपल्याकडे येणार्‍या पै पाहुण्यांंना दाखवले तरी त्यांच्या ज्ञानात भर पडू शकेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सावानाचे वस्तूसंग्रहालय

नाशिकच्या नावलौकिकात नेहमीच भर घालणारे सावानाचे वस्तू संग्रहालय आता चांगलेच खुलले आहे. प्राचीन मूर्ती, मराठा कालखंडातील चित्रकला तसेच, आधुनिक मात्र दुर्मिळ चित्रकलेचा आविष्कार येथे पहायला मिळतो.नाणी, शस्त्र, दस्तऐवज, पुरातत्त्वीय अवशेषांनी सावाना संग्रहालय सज्ज झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या