Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक छायाचित्रण दिन विशेष : छायाचित्रण व्यवसायाला घरघर

जागतिक छायाचित्रण दिन विशेष : छायाचित्रण व्यवसायाला घरघर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

197 वषार्ंची उज्वल परंपरा असलेली छायाचित्र कला आता प्रत्येकाला सहजसाध्य झाली आहे.हातात मोबाईल असलेला प्रत्येक माणूस आज छायाचित्र काढून छायचित्रण कलेचा आनंद घेत आहे. मात्र ज्यांंचा या व्यवसायावर उदरनिर्वाह होता त्यांनी मात्र काळाची पावले ओळखून बदल न स्विकारल्याने त्यांना या व्यवसायातून हद्दपार होण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

आज (दि.19) ‘जागतिक छायाचित्रण दिन’. प्रत्येक छायाचित्रकारासाठी महत्वाचा दिवस.हा दिवस जगभरातील छायाचित्रकाराला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करण्यासोबतच त्यांनी काढलेल्या खास फोटोंना जगभरातील फोटो प्रेमींच्या समक्ष प्रस्तुत करणें असते. या दिनाची सुरुवात 2010 पासून झाली. फ्रान्समधील जोसेफ नीसफोर निपसे आणि लुईस डॅगुएरे या दोघांनी ‘डॅग्युरिओटाइप’चा शोध लावून प्रथमच छायाचित्रण प्रक्रिया विकसित केली.

फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सने 9 जानेवारी 1837 रोजी अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध जाहीर केला. ही घोषणा झाल्यानंतर 10 दिवसांनी फ्रेंच सरकारने आविष्काराचे पेटंट खरेदी केले आणि ते जगाला भेट म्हणून कॉपीराइट न ठेवता दिले.19 ऑगस्ट 1939 रोजी सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. म्हणून हा दिवस ‘जागतिक छायाचित्रण दिन’ म्हणून साजरा होतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

1839 मध्ये विल्यम हेन्री फॉक्स टालाबॉटने छायाचित्र काढण्याची प्रक्रिया सुलभ केली. टालाबॉट यांनी कागदावर आधारित मीठ प्रिंट वापरून एक अधिक अष्टपैलू छायाचित्रण प्रक्रियेचा शोध लावला. तसेच अमेरिकेचे फोटो प्रेमी रॉबर्ट कॉर्नेलियस यांना जगातील पहिले सेल्फी क्लिक करणारे व्यक्ती मानले जाते.दिडशे वर्षात या क्षेत्रात प्रगती होत गेली.अनेकांच्या हाताला त्यामुळे काम मिळाले. मात्र आता मोबाईलच्या युगात या व्यवसायाला काही अंंशी झळ सोसावी लागली.ज्यांनी बदल स्विकारले नाही त्यांंना या व्यवसायातून बाद व्हावे लागले.

पोलिस तपासात न्याय सहाय्यक छायाचित्र तज्ञांंची आजपर्यंत खूपच मदत झाली आहे. 1843 मध्ये बेल्जीयम येथे व 1851 मध्ये डेन्मार्क येथे तुरुंगातील कैंद्यांचे फोटो काढून गुन्हेगारांचे रेकॉर्ड ठेवण्यास सुरवात झाली.1870 मध्ये इतर देशांना याचे महत्व पटले. डॉ.एडमंंड लेफार्ड यांनी या कलेचा उपयोग न्यायसहायय्क कामासाठी करण्यास सुरवात केली. कोणताही गुन्हेगार गुन्हा करतांना त्यावर छाप सोडतो. त्या छापाच्या छायाचित्रांद्वारेे गुन्हेगाराला सबळ पुराव्यापर्यंंत आणून शिक्षा देण्यासाठी त्याचा उपयेाग होऊ शकतो. हे त्यांंनी दाखवून दिले. त्याचा उपयोग अद्यापही होत आहे. त्यामुळे नेमका गुन्हा कसा घडला? खरा गुन्हेगार कोण ? हेही सिध्द होऊ लागले. छायाचित्रण हा छंद असला तरी त्यात कौशल्य प्राप्त करुन उत्तम व्यवसाय अथवा शासकीय नोकरीही मिळवता येते.अशा या कलेने अनेकांना रोजगाराचे साधन खुले करुन दिले आहे.

पूर्वी पोलिस खात्यात छायाचित्रकार तज्ज्ञांंच्या मदतीने न्यायसहाय्यक छायाचित्र घेतली जात.मात्र हल्ली उपलब्ध पोलिसांनाच ते काम सोपवले जाते. बरेच कर्मचारी जुजबी ज्ञानावर छायाचित्रण करत आहेत. त्यांच्यावरील इतर कामांचा ताण पहाता ते योग्य अशी छायाचित्रे काढतीलच याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे कौशल्यप्राप्त छायाचित्रकारांना या क्षेत्रात नशीब आजमावण्यांची संधी आहे.

अनिल जगताप, न्यायसहाय्यक छायाचित्रकार तज्ज्ञ, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या