Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रात जगातील सर्वात पहिले रस्त्यावरील बांबूचे कठडे, “बाहु बल्ली”, वाचा कुठे...

महाराष्ट्रात जगातील सर्वात पहिले रस्त्यावरील बांबूचे कठडे, “बाहु बल्ली”, वाचा कुठे झाला हा प्रयोग..

नवी दिल्ली | New Delhi

आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकत महराष्ट्रातल्या विदर्भ (Vidarbha) भागात वणी-वरोडा महामार्गावर (Vani-Varoda highway) जगातील पहिले 200 मीटर लांब असे बांबूचे रस्त्याकडेचे कठडे म्हणजे बांबू क्रॅश बॅरियर (Bamboo crash barrier) उभरण्यात आले आहेत.

- Advertisement -

‘बाहु बल्ली’ (Bahu Balli) असं नाव दिलेल्या, या बांबूच्या कुंपण्याचा टिकावूपणा तपासण्यासाठी इंदूरमधल्या पिथमपूर येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स (National Automotive Test Tracks) (NATRAX) सारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये अनेक कठोर परीक्षा घेण्यात आल्या.

रुरकी इथल्या इमारत संशोधन संस्था (CBRI) सेंट्रल येथे आयोजित केलेल्या आगनिरोधक चाचणीत या कुंपणाला प्रथम श्रेणी मिळाली. तसेच, इंडियन रोड काँग्रेसनेही (Indian Road Congress) त्याला मान्यता दिली आहे. बांबू कुंपणाचे पुनर्वापर मूल्य 50-70 टक्के आहे तर स्टीलच्या कुंपणाचे पुनर्वापर मूल्य 30-50 टक्के आहे.

बांबुसा बालकोआ या बांबूच्या प्रजातीपासून, हे कुंपण बनवण्यात आले आहे. डांबरापासून बनवलेल्या क्रिओसोट (Creosote) या लाकूड रक्षक तेलाने त्यावर प्रक्रिया केली गेली आहे. तसेच हाय-डेन्सिटी पॉली इथिलीनचे (High-density polyethylene) लेपन त्यावर करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बांबूचे हे मजबूत कठडे तयार करण्यात आलेले यश बांबू (bamboo) क्षेत्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी उल्लेखनीय आहे, कारण हा क्रॅश बॅरियर स्टीलला एक परिपूर्ण पर्याय ठरू शकेल आणि पर्यावरणविषयक प्रश्नावरही त्यामुळे उत्तर मिळू शकेल. त्याशिवाय, हा एक कृषीसंलग्न ग्रामीण व्यवसाय म्हणून देखील उपयुक्त ठरू शकेल अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Transport and Highways) दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या