Sunday, November 24, 2024
Homeराजकीयवरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शहा यांची यांची शिवसेनेतून हकालपट्टी

वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शहा यांची यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई । Mumbai

मुंबईतील (Mumbai) वरळी हिट अँड रन (Worli hit and run) प्रकरणाने राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा (Rajesh Shah) हे शिंदे गटातील (Shiv Sena Shinde Group) पदधिकारी आहेत.

- Advertisement -

यामुळे या प्रकरणावरून विरोधकांकडून शिंदे गटाला लक्ष्य केले जात आहे. यानंतर शिंदे गटाने मिहीर (Mihir Shah) शहा याच्या वडिलांवर मोठी कारवाई केली आहे. शिंदे गटाने मिहीरचे वडील राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

वरळी येथे बीएमडब्ल्यू (BMW car) या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शहा याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आज मिहीर शहा याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

नक्की वाचा – अंबानींच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरेंचा डान्स, विरोधकांकडून झाले टीकेचे धनी

अपघात झाल्यानंतर मिहीर शहा याने पलायन केलं होतं. रविवारपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी मिहीर शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबरोबरच आरोपी मिहीर शहा याची आई आणि दोन बहिणांनीही मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे.

कोण आहेत राजेश शहा ?

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पालघर जिल्हाप्रमुख असलेल्या राजेश शहांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राजेश शहा यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाकडून ही कारवाई करण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या या कारवाईनंतर राजेश शहा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

नक्की वाचा – भाजप आमदाराचे राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, “त्यांना संसदेत कोंडून…

यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांची पालघर जिल्ह्याचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच, राजेश शहा यांनी नुकताच जिल्ह्यात कोकण पदवीधरचा प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीतील हेमंत सवरा यांच्या प्रचारात देखील ते सक्रिय होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या