Saturday, May 25, 2024
Homeक्रीडाWPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स-युपी वॉरियर्स आज आमनेसामने

WPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स-युपी वॉरियर्स आज आमनेसामने

मुंबई | Mumbai

महिला आयपीएलमध्ये (WPL) आज मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा सामना युपी वॉरियर्स (UP Warriors) संघाशी होणार आहे. महिला आयपीएल स्पर्धेचा हा पाचवा सामना असणार आहे…

- Advertisement -

दोन्ही संघांनी आपल्या सलामीच्या सामन्यात विजय संपादन केल्यामुळे विजयी हॅट्रिक करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. दिल्ली मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाविरुद्ध ६० धावांनी दणदणीत विजय संपादन केल्यामुळे दिल्ली आता युपी वॉरियर्स संघावर मात करून आपला दुसरा विजय संपादन करण्यासाठी नवीन डावपेचांसह मैदानात उतरणार आहे.

अलिसा हिलीने युपी संघाला सलामी सामन्यात रोमहर्षक विजय संपादन करून दिला आहे. दोन्ही संघाची तुलना केल्यास दिल्लीचा संघ अधिक संतुलित दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीच्या सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लाँनिंग यांनी शानदार अर्धशतके झळकावली होती.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

तर दिल्ली संघाची गोलंदाज तारा नॉरीसने ५ फलंदाज बाद करून त्यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. पहिल्या सामन्यातील शानदार कामगिरीच्या बळावर विजय संपादन केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स आजच्या सामन्यात आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता कमी आहे. हा सामना मुंबईच्या डीवाय पाटील क्रिकेट मैदानावर होणार सायंकाळी ७:३० वाजता सुरु होणार असून, सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ १ वाहिनीवर करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मोठी कारवाई! बोटीतून ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त; पाच जणांना अटक

युपी वॉरियर्स संघाबद्दल सांगायचे झाले तर, ग्रेस हॅरिस आणि किरण नवगिरे यांनी धडाकेबाज खेळी साकारून गुजरात जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात युपी संघाच्या विजयात मोलाचे योगदान देऊन संघाला विजय मिळवून दिला होता. दोन्ही संघांमध्ये अनेक चांगले खेळाडू असल्यामुळे एक चुरशीचा सामना पाहण्याची संधी सर्व क्रिकेट प्रेमींना मिळणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या