मुंबई | Mumbai
महिला आयपीएल (Women’s IPL) स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना आज शनिवारी (दि.१५ मार्च) रोजी मुंबई (Mumbai) येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे तर मेग लॅनिंगकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद आहे. विशेष म्हणजे महिला आयपीएल स्पर्धेमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग तिसऱ्या हंगामात अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, अद्याप आपल्या पहिल्या विजयाची दिल्ली कॅपिटल्स संघाला प्रतिक्षा आहे.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित केला आहे. विशेष म्हणजे महिला आयपीएल क्रिकेट इतिहासात दोन्ही संघांमध्ये दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.मुंबई इंडियन्स संघाला अंतिम फेरीत पोहोचविण्यात नॅट सेवियर ब्रंट आणि हिली मॅथ्यूजने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नॅट सेवियर ब्रंटने संपूर्ण स्पर्धेमध्ये ४९३ धावा केल्या असन ५ अर्धशतके झळकावली आहेत.
तसेच ९ गडी बाद केले आहेत. तर हिली मॅथ्यूजने ३०४ धावा केल्या असून १७ गडी बाद केले आहेत. तसेच फिरकी गोलंदाज अमेलिया केरने १६ गडी बाद केले आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून शेफाली वर्माने ३०० तसेच मेग लॅनिंगने २६३ धावा केल्या आहेत. मात्र, जेमिमा राॅडरिक्स आणि मेरीझेन केप यांनी निराशा केली आहे.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शेफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मारिजाने कॅप, जेस जोनासन, सारा ब्राइस, निकी प्रसाद, शिखा पांडे, तितस साधू, मिन्नू मणी.
सलिल परांजपे, नाशिक