Wednesday, May 29, 2024
Homeनगरकुस्तीगीर संघ घेणार 100 पैलवान दत्तक - खा. तडस

कुस्तीगीर संघ घेणार 100 पैलवान दत्तक – खा. तडस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

4 ते 9 नोव्हेंबर रोजी होणार्‍या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात गादी गटातून श्रीगोंदा येथील तुषार सोनवणे व केडगाव येथील सुदर्शन कोतकर यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. यात कोतकर यांनी विजय संपादित केल्याने त्यांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

- Advertisement -

तसेच माती गटामध्ये युवराज चव्हाण व मनोहर कर्डिले यांच्यामध्ये देखील चुरशीची लढत झाली असून चव्हाण यांनी विजय संपादित करीत महाराष्ट्र केसरी साठी मजल मारली. यावेळी राज्य कुस्तीगीर संघ 100 पैलवान यांना दत्तक घेणार असल्याची घोषणा खा. रामदास तडस यांनी केली. नगरला जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा पारपडली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खा. तडस, माजी आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, हिंदकेसरी योगेश दोडके, मुंबई केसरी आबासाहेब काळे, महाराष्ट्र केसरी सइद चाऊस, गुलाब बर्डे, अशोक शिर्के, सचिन जगताप, डॉ. संतोष भुजबळ, शिवाजी चव्हाण. राजेंद्र चोपडा, युवराज करंजुले, रवींद्र कवडे, बबनराव काशीद आदी उपस्थित होते.

यावेळी खा. तडस म्हणाले, पुणे येथे 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त नगरला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा झाली. कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. जेव्हा जेव्हा कुस्ती क्षेत्रात आक्रमणे झाली, तेव्हा महाराष्ट्रातील पैलवानांनी देशाला कुस्तीची ओळख निर्माण करून दिली. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून पहिलवान घडवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. निवड चाचणीत माती विभागात 57 किलो, वजन गटात संकेत सतरकर, 61 किलो वजन गटात विश्वजित सुरवसे, 65 किलो वजन गटात निलेश मोहिते, 70 किलो वजन गटात लक्ष्मण धनगर, 74 किलो वजन गटात सौरभ मराठे, 79 किलो वजन गटात ऋषिकेश शेळके, 86 किलो, वजन गटात हर्षवर्धन पठारे, 92 किलो वजन गटात अनिल लोणारे, 97 किलो वजन गटात अनिल ब्राम्हणे आणि महाराष्ट्र केसरी खुल्या गटात युवराज चव्हाण आदी मल्लांनी विजय मिळवला असून त्यांची पुणे येथे होणार्‍या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली.

पुणे येथे होणार्‍या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील मल्लांनी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविल्यास त्या मलाला एक लाख रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे. आ. संग्राम जगताप यांनी कुस्ती क्षेत्राकडे लक्ष घातले असल्यामुळे खर्‍याअर्थाने पैलवानांना न्याय मिळणार असल्याचा विश्वास राजेंद्र चोपडा यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या