भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाच्या निकालाबाबत मोठी माहिती आली आहे. विनेश फोगाट अपात्रप्रकरणी आज रविवारी 11 ऑगस्टला निकाल येणं अपेक्षित होतं. या निकालाकडे सार्यांचं लक्ष लागून होतं. मात्र आता नवी माहिती समोर आली आहे. अपात्रतेप्रकरणी आजही निकाल येणार नाही. त्यामुळे भारतीयांची प्रतिक्षा आणखी लांबली आहे. आता मंगळवारी 13 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येणं अपेक्षित आहे.
- Advertisement -
अंतिम सामन्याआधी विनेशचं प्रमाणापेक्षा 100 ग्राम वजन जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. विनेशने त्यानंतर सीएएस अर्थात कोर्ट ऑफ अबिट्रेशन ऑफ स्पोर्ट या क्रीडा लवादात अपात्रेच्या निर्णयाविरोधात धाव घेतली. सुवर्ण पदकाचा सामना खेळण्याची विनंती फेटाळल्यानंतर विनेशने संयुक्तरित्या रौप्य पदक देण्याची मागणी विनेशची आहे.