Thursday, June 20, 2024
Homeमुख्य बातम्यालेखक-प्रकाशक साहित्य संमेलन : नव्या पिढीला वाचनासाठी अनुकूल माध्यम तयार करू

लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन : नव्या पिढीला वाचनासाठी अनुकूल माध्यम तयार करू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक शहराला प्राचीन काळापासून साहित्याची परंपरा आहे. येथील माती सृजनशिलतेला जन्म देते. नवीन पिढीतही समृध्द लेखक, प्रकाशक तयार होत आहेत. वाचन संस्कृती कमी होत असल्याचे आव्हाण असले तरी नव्या पिढीला ज्या माध्यमातून वाचायला आवडते त्या अनुकूल माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करु, असा सूर येथील चर्चासत्रात व्यक्त झाला.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संंयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात जनस्थानातील साहित्य परंंपरा या विषयावर शेवटचे चर्चासत्र झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा होते. ‘देशदूत’च्या संंपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, सकाळचे संंपादक डॉ.राहुल रनाळकर, वंंदना अत्रे, मृदुला बेळे आदी त्यात सहभागी झाले होते.

डॉॅ. बालाजीवाले यांनी प्राचीन नाणी, शिलालेख,ताम्रपट,पोथ्या, चित्रशैली, ऋषी मुनींच्या साहित्यापासून सुरु झालेला प्रवास स्वातंंत्रवीर सावरकर, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, वसंंतराव कानेटकर, रेव्हरंड टिळक,बाबुराव बागुल यांच्यानंतर आताच्या नव्या पिढीतील विविध प्रथितयश लेखकांच्या नावासह विषद केला. दैनिक ‘देशदूत’च्या माध्यमातून गेल्या 50 वर्षात तयार झालेल्या लेखकांंनी नाशिकची साहित्य परंंपरा समृध्द केली, असे त्या म्हणाल्या.

वंदना अत्रे यांनी नाशिकचे सांस्कृतिक, सामाजिक वातावरण अजुनही नव्या साहित्यिकांंनी आपल्या लेखनातून उतरवण्याची गरज असल्याचे सांगितले. छोटे छोटेे इतिहासाचे धागे जोडून साहित्य परंपरा अजुनही समृध्द करता येईल,सांगितले.

मृदुला बेळे म्हणाल्या, नवीन लेखक विषय मांडण्याच्या तळमळीतून पुढे येतात. सतत नवीन विषयावर पुस्तके प्रकाशित झाली तर मराठी ज्ञानभाषा होईल,असे त्या म्हणाल्या.

रनाळकर यांनी वाचन संस्कृती टिकवण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.भटेवरा म्हणाले, नाशिकने समृध्द साहित्य परंंपरा टिकवून ठेवली आहे. आता नव्या माध्यमातून वाचकांना जोडून ठेवण्याचे काम आपण करु. वसंतराव खैरनार यांनी आभार मानले.यावेळी सावाना पदाधिकार्‍यांसह विविध साहित्यिक व पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या