लंडन | London
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम कसोटी सामना ७ -११ जून दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया संघांमध्ये लंडन येथील केनिंगटन ओव्हल मैदानावर होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर भारतीय वेळेनुसार ३ वाजता होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये हा सामना होणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे असणार आहे. तर स्टीव्ह स्मीथ उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळणार आहे. तर चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रलिया सातवा अंतिम सामना खेळणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचे काही प्रमुख खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत.
अजित पवारांचे शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…
आयपीएलचा अंतिम सामना आटोपून रोहित शर्मा आणि इतर खेळाडू इंग्लंडला रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दोन्ही पर्वात भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. या कसोटी सामन्यासाठी कुकाबुरा चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. मात्र कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत.
अजिंक्य राहाणेचे संघात कमबॅक झाले आहे. भारतीय संघाचे स्टार खेळाडू लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह या सामन्यातून बाहेर पडल्यामुळे ईशान किशन, मुकेश कुमार, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव यांची पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी हवामान स्वच्छ राहणार असून २ दिवस पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
अनुकंपा नोकरदार ते मनपाच्या शिक्षणाधिकारी; लाचखोर सुनीता धनगरांची ‘अशी’ आहे कारकीर्द
भारत आणि ऑस्ट्रलिया संघांमध्ये भारतात होऊन गेलेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असणार आहे. भारतीय कसोटी संघाला पहिल्या पर्वात न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून १० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी विजेतेपद पटकावण्यात यश मिळणार का ? ते पाहणे महत्वाचे असणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक.