Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाWTC Finalच्या एक दिवस आधी रोहितला दुखापत, सराव सत्र अर्ध्यात सोडले

WTC Finalच्या एक दिवस आधी रोहितला दुखापत, सराव सत्र अर्ध्यात सोडले

दिल्ली | Delhi

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर येत्या काही दिवसांमध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित भारताचे नेतृत्व करणार असून विजयासाठी त्याला शक्य ते सर्व उपाय करावे लागणार आहेत.

- Advertisement -

डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक चिंतेची बाब समोर येत आहे. कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे सराव सत्रात पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (6 जून) रोहित शर्मा आपल्या सहकाऱ्यांसह मैदानात सराव करत होता. याच वेळी त्याच्या डाव्या अंगठ्याला चेंडू लागला आणि दुखापत झाल्याचे समोर येत आहे. चेंडू लागल्यानंतर संघाच्या फिजिओंनी त्याच्या अंगठ्याला पट्टी देखील बांधली.

रोहितने पट्टी बांधून पुन्हा सरावाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुरक्षाचे उपाय म्हणून त्याने पुन्हा आपला निर्णय बदलला, असे सांगितले जात आहे. रोहित शर्मा डाव्या अंगठ्याला पट्टी बांधून सराव सत्रातून बाहेर पडल्याने चाहते आणि सहकारी खेळाडूंची चिंता नक्कीच वाढली आहे..

सामन्यापूर्वी रोहित शर्मा म्हणाला की, मला खेळ आणि विजेतेपद जिंकायचे आहे. म्हणूनच आम्ही खेळतो. मात्र, या दरम्यान रोहित त्याच्या दुखापतीबद्दल बोलला नाही. WTC चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून रोजी होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या