Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनयशराज फिल्म्सच्या 'या' निर्णयामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन वीक होणार रोमँटीक

यशराज फिल्म्सच्या ‘या’ निर्णयामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन वीक होणार रोमँटीक

मुंबई | Mumbai

व्हॅलेंटाइन डे (Valentine’s Day) म्हणजे प्रेमाचा दिवस, या दिवसाला एक सांस्कृतिक महत्व आहे. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न प्रत्येकाकडून होत असतात. या भावना अधिक ताज्या व्हाव्यात यासाठी सिनेसृष्टीकडूनही काही विशेष प्रयत्न केले जातात.

- Advertisement -

या वर्षीचा ‘व्हॅलेंटाइन डे’ ही अधिक रोमँटीक करण्यासाठी यशराज फिल्म्सने विशेष निर्णय घेतला आहे. ‘बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है’, ‘अगर ये तुझे प्यार करती हैं तो यह पलट के देखेगी. पलट… पलट..!’ अशा अनेक एव्हरग्रीन डायलॉग्सने सजलेला ‘डीडीएलजे’ म्हणजेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीने बघतात. आता व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने डीडीएलजे (DDLJ) चित्रपट पुन्हा रूपेरी पडद्यावर रिलीज करण्याचा निर्णय यशराज फिल्म्सने घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती सिनेप्रेमींना दिली आहे. काही निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना ‘डीडीएलजे’चा आनंद घेता येणार आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस या चित्रपटगृहांमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाचे शो शुक्रवार (दि.१०) पासून पुढील एक आठवडा थिएटरमध्ये पाहता येणार आहेत.

राखी सावंतचा पती आदिल खान विरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

दरम्यान, १९९५ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला आता २८ वर्षे झाली असून हा चित्रपट आदित्य चोप्राने दिग्दर्शित केला होता. तर निर्मिती यशराज फिल्मने (Yash Raj movie) केली होती. त्यानंतर आता हा चित्रपट पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...