यावल – प्रतिनिधी
यावल तालुक्यात गावठी हातभट्टीची दारू सर्रास विक्री होत असून नामदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) पालकमंत्री जळगाव जिल्हा यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा आढावा बैठकीत पंन्नीची दारू वाश आउट करण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले असून त्याप्रमाणे ‘खरंच यावल तालुक्यातील गावठी हातभट्टी पन्नीची दारू बंद होईल का?’ असे ठळकवृत्त ‘दैनिक देशदूत’ मधून यावल तालुका वार्तापत्र मध्ये प्रसिध्द झाल्याने दै.देशदूच्या दिनांक 26 जुलै 23 रोजी यावल तालुका विशेष पुरवणी प्रकाशन प्रसंगी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वार्ता पत्राचे वाचन केले.
यावल तालुक्यातील सर्व गावठी हातभट्टीची पन्नी दारूचे विक्री होते ती बंद होणे गरजेचे आहे अनेक तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत तर दर महिन्याला एक तरी जण यावल तालुक्यात या दारूमुळे मयत होत आहे अनेकांची संसार उध्वस्त होत आहेत घराघरात भांडण होत आहेत असे प्रमुख सर्वच कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.
सर्वपक्षीय तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांचे एक मत झाले त्यानुसार यावल तालुका सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी यावल पोलीस स्टेशनला जाऊन पी आय राकेश माणगावकर साहेब यांना निवेदन सादर करून दारूबंदीची मागणी केली याप्रसंगी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते हिरालाल भाऊ चौधरी नारायण बापू चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक मुकेश पोपटराव येवले माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील मनसेचे चेतन दिलीप आढळकर भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश अरे वा फेगडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख तुषार सांडू सिंग पाटील भरत चौधरी सर राजेश श्रावगी पप्पू जोशी भाजपाचे सरचिटणीस विलास चौधरी उज्जैन सिंग राजपूत भाजपा जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष हेमराज फेगडे शकील दौलत पटेल मोहसीन खान यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली.