Friday, October 18, 2024
Homeजळगावयावल तहसीलदारांची कविता अभ्यासक्रमात

यावल तहसीलदारांची कविता अभ्यासक्रमात

यावल । प्रतिनिधी Yaval

यावल तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी लिहिलेले ‘व्हाईट लिली’ या काव्यसंग्रहातील ‘तू एकदा पूनवेचा’ या कवितेचा समावेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात केल्याने तहसीलदार जितेंद्र कुवर यांचे महाराष्ट्रभरातून कवी व लेखकांमधून कौतुक होत आहे.

- Advertisement -

हा अभ्यासक्रम बीए.बीकॉम. बीएस्सी. पदवी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अभ्यासात असणार आहे.

ही कविता त्यांच्या व्हाईट लिली या काव्यसंग्रहात समाविष्ट असून काव्यसंग्रह 2019 मध्ये ग्रंथाली प्रकाशन मुंबईने ‘व्हाईट लिली’ हे प्रकाशित केले आहे. यावल तहसीलदार जितेंद्र कुवर हे कवी व लेखक ही असून यापुढे ते असे काही ही काव्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिशय सोज्वळ शांत स्वभावाचे व प्रशासनात कुठलीही कुचराई न करता पारदर्शी काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची यावल तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात ओळख आहे.

यावल तालुक्यातील असे भाग्य की, असे तहसीलदार यावल तालुक्याला लाभले. तालुक्यामध्ये तहसीलदार पदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळत असून त्यांच्या ‘तू एकदा पुनवेचा’ या कवितेच्या समावेशामुळे यावलचे नाव महाराष्ट्रभर झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या