Monday, March 31, 2025
Homeजळगावयावल : हिंगोणे गावाजवळ दुचाकींचा अपघात; दोन ठार, तीन गंभीर

यावल : हिंगोणे गावाजवळ दुचाकींचा अपघात; दोन ठार, तीन गंभीर

हिंगोणा, ता.यावल –

येथील हिगोणे (ता.यावल) गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर दोन्ही दुचाकींवरील इतर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.१६ रोजी घडली.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, फैजपूर येथील अलाउद्दीन मुबारक तडवी, नबाब मुराद तडवी व शे. कालु शे.हमीद असे तीघे बांधकाम मजुर दुचाकी हिरोहोंडा क्र. एमएच १९ बीई ९७८७ वरुन डोंगरकठोरा येथे जात असतांना हिंगोणा गावाजवळ यावलकडून बाळापूर ता.मुक्ताईनगर येथे प्लॅटीना दुचाकी क्र. एमएच१९ एएल ९६९१ वरुन पंखा पवार व पावरा हे दोघी समोरुन येत असतांना या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली.

यात अपघातात अलाउद्दीन मुबारक तडवी (रा. तहा नगर फैजपूर) व पंखा पवार (रा. बाळापूर ता. मुक्ताईनगर) हे दोन्ही दुचाकीचालक जागीच ठार झाले. तर अपघातात मयत अलाउद्दीन तडवी यांच्या गाडीवर मागे बसलेले नबाब मुराद तडवी (वय २५, रा. भालोद. ह.मु. फैजपूर) व शे. कालु शे. हमीद (रा.फैजपूर) तसेच मयत पंखा पावरा यांच्या मागे बसलेले श्री.पावरा (रा. बाळापुर ता. मुक्ताईनगर) असे तीघे गंभीर जखमी झाले.

या तीन्ही गंभीर जखमींना उपचारार्थ फैजपूर येथील डॉ.खाचणे यांच्या आशिर्वाद हॉस्पिटल येेथे दाखल करण्यात आले आहे.  या घटनेबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात मयतांविरुद्ध मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घटनेनंतर काही ग्रामस्थांनी १०८ वर फोन लाऊन रुग्णवाहिकेला बोलावले परंतु अपघात झाल्याच्या दिड तास नंतरही रुग्णवाहिका न आल्याने त्यांना जीव गमवावा लागल असे प्रत्यक्ष दर्शनी बोलुन ग्रामस्तांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : शासकीय बांधकाम ठेकेदाराचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींवर...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता .या...