Saturday, September 14, 2024
HomeUncategorizedवार्षिक भविष्य २०२४ - सिंह : अभुतपूर्व यश संपादन करणारे वर्ष

वार्षिक भविष्य २०२४ – सिंह : अभुतपूर्व यश संपादन करणारे वर्ष

पुरुष – समस्त सिंह राशि पुरुषांना सांगावयाचे वाटते की ग्रहांची साथ असावी तर या नवीन वर्षातील ग्रहमानासारखी. फारच सुंदर असे ग्रहयोग आपले भाग्यात विराजमान होत आहेत. हा सर्व योग संपूर्ण वर्षभर राहणार आहे. परंतू यासाठी आपणास कर्तव्यदेखील करावे लागणार आहे. कर्तव्याला ग्रहांची साथ म्हणजे आपणास हवे ते आपण कर्तव्य करा. आपल्या ज्या इच्छा असतील त्या इच्छेसाठी कामे करा. त्यात आपणास संपूर्णपणे सफलता मिळेल. सर्वच दृष्टीने नवीन वर्ष भाग्यकारक, विवाह योगाचे, संतती प्राप्तीचे, उन्नतीचे जाणार आहे.

- Advertisement -

महिला – समस्त सिंह राशिच्या महिलांच्याबाबतीत भाग्ययोगाच्या पायघड्या आपणासाठी घालून ठेवलेल्या आहे. कर्तव्यरुपी चालण्याचे कष्ट आपणास तेवढे घ्यावे लागणार आहेत. ज्या विवाहीत महिला आहेत संसारात वाद असतील तर मिटतील. कोर्ट कचेरी सुरु असेल तर समझोता करण्यास उत्तम काळ. घटस्फोटीत, साखरपुडा तोडलेल्या महिला, प्रेमयोगात दुरावा आलेल्या महिला, यांचे विवाह या नवीन वर्षात ‘शुभमंगल सावधान’ झालेच म्हणून समजावे. संतती समस्या आहेत तर या समस्या दूर होतील. पती-पत्नीमध्ये प्रेममय वातावरण राहील. धार्मिक यात्रा घडतील.

नोकरवर्ग – जे नोकरवर्ग सरकारी असोत का खासगी कंपनीत असो का घरगुती खासगी कामगार अशा समस्तांची सिंह राशी असेल तर हे वर्ष आपणास सर्वचबाबतीत प्रगतीपर ठरणार आहे. आपली प्रामाणिकता व वेळेच्याआत कार्य संपन्नता असेल तर आपण कायमस्वरुपी नोकरीस पात्र रहाल. पगारवाढ निश्चितपणे होईल. खासगी कंपनीचे नोकरवर्गास बक्षीसी प्राप्त होईल. सरकारी नोकरवर्गास पगारवाढ इतर सुविधांचा लाभ मिळेल. ज्यांना नोकरीच्या इच्छा आहे त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. जुनी नोकरी सोडून नवीन ठिकाणी पण नोकरी प्राप्त होईल.

व्यवसाय – आपण व्यवसाय करीत आहेत. आणि आपली राशि सिंह आहे. आपला कुठलाही व्यवसाय असो तर येते नवीन वर्ष आपणास भरभराटीचे जाणार आहे. ‘छप्पर फाडके’ कधी मिळत नाही ते मिळवावे लागतात म्हणून हे नवीन वर्ष आपणास मोठ्याप्रमाणावर व्यवसाय करण्याच्या संधी देत आहेत. खासकरुन सोन्या-चांदीच्या व्यापार्‍यांसाठी हे वर्ष ‘लकी’ ठरणारे आहे. शाळा कॉलेज, क्लासेस, अकॅडमी, गुरुजनवर्ग, शालेय साहित्य विक्रेते, पूजा सामान व्यावसायिक, धार्मिक साहित्य उत्पादक, विक्रेते या सर्वांना नवीन वर्षात भरपूर लाभ मिळणार आहे.

विद्यार्थीवर्ग – विद्यार्थीवर्गास आता खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. शासनाने आता मार्क्सच्या अटी घालण्याचे धोरण अवलंबिलेले आहे. आपली सिंह राशी असल्यास आपणास या नवीन संपूर्ण वर्षात उत्तमप्रकारच्या ग्रहांची आपणास साथ मिळणार आहे म्हणून आपण या नवीन वर्षात आपणास टेंशन घेण्याचे काम नाही. आपण केवळ अभ्यासात मन लावण्याचा प्रयत्न करावा. मित्र संगतीत वेळ घालवू नये. इलेट्रीकल इंजिनिअर, सौरऊर्जा इंजि, मेडिकल, दंत चिकित्सक, त्वचा चिकित्सक, डोळ्याचे डॉक्टर्स, भुलतज्ज्ञ शिक्षण घेणारे विद्यार्थीवर्गाला अतीउत्तम वर्ष असणार आहे.

राजकारणी – आपण कुठलेही पक्षातील राजकारणी असाल. परंतू आपला पक्ष बदल झालेला नसेल व आपली राशी सिंह असेल तर आपणास नवीन वर्ष हे यशाचे असणार आहे. ग्रामपंचायती, सोसायटी, संस्था, शाळा, कॉलेज, नगरपालिका, आमदार, खासदार या सर्वांना नवीन वर्ष उत्तम आहे. यश मिळवून देणारे असणार आहे. आपले पक्षाचे हायकमांड आपलेकडे जरुर लक्ष देणारे आहेत. मात्र आपलेच जवळची लोक आपल्या पदास धक्का लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. याबाबतीत सावधान असावे. आपण कार्यकर्ते आहात तर आपण प्रत्यक्ष निवडणुकीत भाग घेवू शकतात.

आरोग्य – या नवीन वर्षात जी वृद्धमंडळी आहेत व त्यांची सिंह राशी आहे तर या वर्षात वृद्धजणांनी आपले आरोग्याची चिंता सोडून द्यावी. अती वृद्धजणांचे आयुष्यदेखील या नवीन वर्षात वाढणार आहे. आपले आयुष्याची दोरी बळकट असणार आहे. ज्यांचे ऑपरेशन झाले आहे तसेच आपले आरोग्याबाबत डॉक्टरांनादेखील चिंता आहे तर ही चिंता या वर्षात तरी राहणार नाही. गर्भवती महिलांना पण आपले इच्छेनुसार संततीचा लाभ होणार आहे. आरोग्य पूर्ण वर्ष असेल.

नातीगोती – आपली राशी सिंह आहे व आपल्या स्वभावामुळे काही नाती दुरावली आहेत. काही गैरसमज झालेले असतील तर या वर्षात तुटलेली नातीगोती जवळ येतील व या नातेसंबंधातूनच आपण स्वतः अविवाहित असाल किंवा आपली मुले-मुली विवाह इच्छुक असल्यास विवाह संबंध जुळणारे आहेत. आपली इच्छा असलेस ‘शुभमंगल सावधान’ संपन्न होणार आहे. साखरपुडा करण्याच्या बंधनास पण हे नवीन वर्ष उत्तम चांगले आहेत. नातेगोतीसह तिर्थाटनाचे योग बलवत्तर आहेत. सासू-सुनांमधील वाद संपून दूर गेलेली सूनबाई आपले घरी येईल.

आर्थिक – मागील वर्षाच्या काळाने आर्थिकबाबतीत आपले डोळ्यात पाणी आलेले होते. उसनवारी मागणीच्या व्यक्तींची पैश्यांसारखी मागणी होत होती. काही कार्यात आर्थिक नुकसानी पण झालेली होती आता या गोष्टी विसरा. हे नवीन वर्ष सिंह राशी व्यक्तींना अधिक आर्थिक लाभ मिळवून देणारे असणार आहे. आपली काही रक्कम दुसरीकडे अडकली असेल ती पण प्राप्त होईल. जुनी उधारी वसुल होईल. असलेल्या कर्ज समस्या पण मार्गी लागणार आहेत. आपण जे काही कार्य करीत असाल त्यातून आपले आर्थिक कार्य प्रगतीपथावर कार्यरत राहणार आहे. एकूणच येणारे वर्ष सुख, समाधान व भरभराटीचे असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या