Monday, July 22, 2024
Homeनगरयेळी येथे कुर्‍हाडीने वार झालेल्या हंगे यांचा मृत्यू

येळी येथे कुर्‍हाडीने वार झालेल्या हंगे यांचा मृत्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

चार दिवसापुर्वी तालुक्यातील येळी येथे शेत जमीनीच्या वादातून कुर्‍हाडीने डोक्यात वार करून गंभीर जखमी झालेल्या सारिका बाप्पू हंगे (30, रा.शंकरवाडी, सोनई) ता.नेवासा हल्ली रा.येळी.ता.पाथर्डी) यांचा अहमदनगर येथे रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत पाथर्डी पोलीसांनी दोन संशयितांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

नामदेव अंबादास बडे (रा.येळी, ता.पाथर्डी), अतुल पोपट फुंदे (रा.कोळसांगवी शिवार, ता.पाथर्डी) यांचे विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये खूनाचा गुन्हा वाढवण्यात आला आहे. सोमवार (दि.29) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. संशयित नामदेव बडे व अतुल फुंदे यांनी येळी येथे राहत असलेल्या कविता घुगे यांच्या घरी येऊन घरासमोरील पडवी मध्ये व पडवीचे बाहेर लताबाई रामकिसन बडे व सारिका बापू हंगे यांचे डोक्यात कुर्‍हाडीने वार करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्या प्रयत्न केला होता. कविता शरद घुगे यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात नामदेव अंबादास बडे व अतुल पोपट फुंदे यांच्या विरोधात जीवे मारण्याचा गुन्हा दाखल दोघांना अटक करण्यात आली होती.

घटनेत गंभीर जखमी असलेल्या लताबाई रामकिसन बडे व सारिका बापू हंगे यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या सारिका हंगे यांचा बुधवारी मृत्यू झाला. फिर्यादी कविता शरद घुगे यांचे वडील रामकिसन कारभारी बडे व त्याचा पुतण्या नामदेव आंबादास बडे रा.येळी ता.पाथर्डी यांच्यात शेत जमीन वाटपावरुन यापुर्वी देखील वाद झालेले आहेत.असे फिर्यादीत म्हटले आहे .मयत सारिका हंगे यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या