Wednesday, March 26, 2025
HomeराजकीयVideo : विधानसभा निवडणुकीतही मतदार जनता महाविकास आघाडी बरोबर राहील

Video : विधानसभा निवडणुकीतही मतदार जनता महाविकास आघाडी बरोबर राहील

येवला । प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतही मतदार जनता महाविकास आघाडी बरोबर राहील असा विश्वास खासदार भास्कर भगरे यांनी व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीच्या खासदारांच्या वतीने वाणिज्यमंत्र्यांना निवेदन देऊन कांदा निर्यात शुल्क कमी करून किंवा माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करणार असल्याचेही खासदार भगरे यांनी सांगितले.

- Advertisement -
विधानसभा निवडणुकीतही मतदार जनता महाविकास आघाडी बरोबर राहील : खासदार भास्कर भगरे

आभार दौऱ्यानिमित्ताने येवला दौऱ्यावर आलेले खासदार भगरे ज्येष्ठ नेते ॲड. माणिकराव शिंदे यांचे रायगड निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाम साधर्म्य असणारे उमेदवार उभे करण्याचा चुकीचा पायंडा सत्ताधाऱ्यांनी पाडला आहे. खरंतर अशा गोष्टी राजकारणात होऊ नये असे वाटते. मात्र पक्षीय पातळीवर या संदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागितल्याचे सांगून खासदार भगरे म्हणाले,

एका प्रश्नावर बोलताना खासदार भगरे म्हणाले, केंद्रात भाजप सत्तेत असले तरी संसदेत सक्षम विरोधी पक्ष असल्याने केंद्राच्या चुकीच्या निर्णयाला शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करू. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कांदापट्ट्यातील खासदारांना एकत्र करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येवला मतदार संघात लासलगाव येथे नाफेडचे केंद्र आहे, येवलेकरांची मागणी असेल तर त्यादृष्टीने प्रयत्न करू. मुक्तीभूमीवर दर्शनासाठी गेलो होतो तेथील कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचे एका प्रश्नावर बोलताना खासदार भगरे म्हणाले. जल जीवन कामांबाबत असणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन याबाबत आढावा घेतला जाईल चुकीची कामे आढळून आली तर त्याबाबत कारवाई करण्याची शिफारस करू असेही भगरे यांनी स्पष्ट केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vidhan Sabha Deputy Speaker: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज...