Tuesday, November 10, 2026
Homeक्राईमममदापूर शिवारातील कोळगावात धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

ममदापूर शिवारातील कोळगावात धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

येवला | प्रतिनिधी
लक्ष्मीपूजनाच्या रात्री ममदापूर शिवारातील कोळगाव परिसरात तीन चोरट्यांनी धाडसी चोरी करून खळबळ उडवली. राजापूर–रेंडाळे रस्त्यालगत मुंढे वस्ती परिसरातील अरुण भागाजी गिडगे यांच्या घरात पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून कुटुंबीयांना मारहाण केली. घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला.

यावेळी गिडगे यांचा मुलगा तेजस याने प्रसंगावधान राखत चोरट्यांना प्रतिकार केला. चोरट्यांनी त्याला मारहाण केली; मात्र तेजसने एका चोरट्याला पकडून ठेवण्यात यश मिळवले. अन्य दोघे अंधाराचा फायदा घेत फरार झाले. नागरिकांच्या मदतीने पकडलेल्या संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

- Advertisement -

चोरट्यांनी २ लाख २८ हजार रुपयांची रोकड, दीड तोळ्याची सोन्याची पोत आणि दहा भार चांदीची साखळी असा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी नातेवाइकांकडून उसनवारीने आणलेली रक्कमही चोरीला गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

संघर्ष मोर्चातून विवेकानंद पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा; म्हणाले, तुमचा कोरम २०२९…

याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार माळोदे तपास करीत आहेत. तेजसच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत असून फरार चोरट्यांना पकडण्याची आणि ग्रामीण भागातील पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...