Wednesday, February 4, 2026
HomeनगरCrime News : तरूण ठेकेदारावर कोयत्याने खूनी हल्ला

Crime News : तरूण ठेकेदारावर कोयत्याने खूनी हल्ला

मनपा निवडणुकीत विरोधी उमेदवाराचे काम करत असल्याचा राग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिका निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत आमचे काम का करत नाही, या कारणावरून सात जणांच्या टोळीने ठेकेदार तरूणाला लोखंडी कोयता आणि रॉडने बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

चेतन शशिकांत अग्रवाल (वय 33, रा. आनंदबाग, बुरूडगाव रस्ता) असे जखमी तरूणाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास झिंजुर्डे, दत्ता झिंजुर्डे, प्रशांत झिंजुर्डे, महेश झिंजुर्डे, ऋषीकेश चौधरी, योगेश गुंड आणि विनोद जाधव यांच्याविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. चेतन अग्रवाल हे 30 डिसेंबर रोजी त्यांच्या प्रभागातील नगरसेवकाचा अर्ज भरण्यासाठी गेले असता संशयित आरोपींनी त्यांना निवडणुकीत काम करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 31 डिसेंबर रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास चेतन अग्रवाल हे भोसले आखाडा येथील कोहिनूर किराणा दुकानासमोर थांबले होते.

YouTube video player

त्यावेळी संशयित आरोपींनी तेथे येऊन शिवीगाळ केली. संशयितांच्या हातात लोखंडी कोयता व रॉड होते. चेतन यांच्या डोक्यात कोयत्याने प्रहार केला. यामध्ये चेतन गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. संशयित आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा हल्ला इतका भीषण होता की चेतन चक्कर येऊन खाली पडले. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मारहाण
दरम्यान, विरोधी गटाने देखील कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शैला दिलीपराव झिंझुर्डे (वय 54, रा. बुरूडगाव रस्ता) यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुलगा विकास झिंझुर्डे यांना धमकी देत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर फिर्यादीवरून चेतन अग्रवाल, विजु फुलसौंदर (पूर्ण नाव माहिती नाही) व इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (31 डिसेंबर सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादींचा मुलगा विकास यास भोसले आाखाडा येथे संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ केली. मारहाण करत उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर जिवे मारून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...