दिल्ली | Delhi
राजस्थानमध्ये चालेल्या राजकीय नाट्यावर भाजप नेत्या उमा भारती यांनी भाष्य केले आहे. त्यांनी या सर्व प्रकारसाठी राहुल गांधीच जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.
- Advertisement -
त्या बोलतांना म्हणाल्या, “मध्यप्रदेश मध्ये जे झालं आणि आता राजस्थान मध्ये राजकीय नाट्य चालू आहे, त्यासाठी राहुल गांधीच जबाबदार आहे. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना प्रोत्साहन दिले जात नाही. त्यांना भीती वाटते की जोतीरादित्या सिंधिया आणि सचिन पायलट यांच्या सारख्या सुशिक्षित नेतृत्व उच्च पदावर गेले तर राहुल गांधी यांना पाठीमागे केले जाईल.” अशी टीका त्यांनी केली आहे.