Monday, May 27, 2024
Homeनाशिकऑनलाईन फसवणूक झाल्याने तरुणाची आत्महत्या

ऑनलाईन फसवणूक झाल्याने तरुणाची आत्महत्या

वावी | वार्ताहर | Vavi

सिन्नर तालुक्यातील वावी येथील राहुल योगेश वाघ (२२) याने ऑनलाईन कंपनीला नादाला लागून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. फसव्या ऑनलाईन कंपनीच्या नादाला लागून राहुलने ११ हजार या कंपनीत पाठवले होते.

- Advertisement -

त्याच्या मोबदल्यात कंपनी त्याला आधिक पैसे देणार होती. परंतू त्या कंपनीने त्याला पैसे न पाठवता त्याच्याकडून अधिक पैशाची मागणी केली. या मागणीला त्रस्त होत त्याने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली.

त्याने सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पीएसआय पाराजी वाघमोडे, बाळासाहेब आहेर, पो. ह. प्रवीण सोनवणे, वाहन चालक तांबे यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह दोडी आरोग्य विभागात पाठविण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या