Friday, February 6, 2026
Homeनगरबांधकामावरून पाय घसरून पडून तरुणाचा मृत्यू

बांधकामावरून पाय घसरून पडून तरुणाचा मृत्यू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सक्कर चौकात गुंजाळ हॉस्पिटल जवळ बांधकाम चालू असताना पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. जितेंद्र भगत (वय 43, रा. बिहार) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (27 डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास घडली. भगत यांचा पाय घसरून पडल्याने ते जखमी झाले.

- Advertisement -

त्यांना त्यांचा मित्र दीपक साने यांनी पुढील उपचारासाठी खासगी रुग्णवाहिकेने सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी ते उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे घोषित केले. डॉ. खेडकर यांनी याबाबत पोलीस अंमलदार बोर्डे यांना माहिती दिली. बोर्डे यांनी याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार गाडीलकर करीत आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...