Thursday, September 12, 2024
HomeनाशिकNashik Crime News : ५० कोटींची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तरुणाला सात...

Nashik Crime News : ५० कोटींची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तरुणाला सात लाखांना गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकार सुरूच असून ५० कोटी रुपयांची लॉटरी (lottery) लागल्याचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल ७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राहुल मुरलीधर मंडलिक (वय ३२, रा. सावरकर चौक, नवीन नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे….

- Advertisement -

मोठी बातमी! आमदार अपात्रता प्रकरणी नबाम रेबिया खटल्याचा पुर्नरविचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार; सात न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार सुनावणी

याबाबत अधिक माहिती अशी की, मंडलिक हे दि. १३ फेब्रुवारी रोजी घरी असताना अज्ञात टेलिग्रामवरील आय. डी. धारकाने (Unknown Telegram ID Holder) त्याच्याशी संपर्क साधून ५० कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखविले.

Sanjay Raut : “पुरावे असल्याशिवाय आमचे लोक बोलणार नाहीत”; राऊतांकडून सुषमा अंधारेंनी मंत्री भुसेंवर केलेल्या ‘त्या’ आरोपांचे समर्थन

दरम्यान, यानंतर त्या भामट्याने मंडलिक यांना वेगवेगळ्या चार्जेसचा बहाणा करुन स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, येस बँकेच्या खात्यांवर, तसेच गुगल पे यूपीआय खात्यावर १३ फेब्रुवारी ते १३ मे २०२३ या काळात एकूण ७ लाख ७ हजार ५९४ रुपये ८३ पैसे उकळले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station) अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

NCP Crisis : “दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र…”; अजित पवारांच्या पत्राला शरद पवार गटाकडून जोरदार उत्तर

- Advertisment -

ताज्या बातम्या