Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमCrime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार

Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर-पुणे हायवेवरील लॉजिंगमध्ये युवतीवर जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेवगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित 19 वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात बाप-लेकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बडे व नवनाथ बडे (दोघे रा. ढाकणेवाडी, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. विजय बडे याने नगर-पुणे हायवेवरील एका लॉजिंगमध्ये पीडितेशी जबरदस्तीने संबंध ठेवले.

- Advertisement -

यावेळी संशयित आरोपीने मोबाईलमध्ये पीडितेचे फोटो काढून घेतले. त्यानंतर माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करीन, अशी धमकी देत त्याने वारंवार छळ केला. पीडितेने आरोपीचा फोन घेणे बंद केल्याचा राग मनात धरून आरोपीने पीडितेचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केले. धक्कादायक बाब म्हणजे, पीडिता फिर्याद देण्यासाठी जात असताना संशयित आरोपी विजय बडे आणि त्याचे वडील नवनाथ बडे यांनी बुर्‍हाणनगर चौकाजवळ तिला व तिच्या वडिलांना अडवून शिवीगाळ व दमदाटी करत हे प्रकरण आपापसात मिटवण्यासाठी दबाव आणला. अ

खेर पीडितेने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यस्तरीय समिती

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे अपघात आणि मृत्यू प्रकरणी नुकसानभरपाई देण्याच्या संदर्भात विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या...