Sunday, July 26, 2026
Homeक्राईमCrime News : अत्याचार करून युवतीला हॉटेलमध्ये डांबले

Crime News : अत्याचार करून युवतीला हॉटेलमध्ये डांबले

कामगाराच्या मदतीने मालकाचे कृत्य || सोलापूर रस्त्यावरील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर- सोलापूर रस्त्यावरील अंबिलवाडी (ता. अहिल्यानगर) शिवारातील एका हॉटेल मध्ये युवतीवर हॉटेल मालकानेच कामगाराच्या मदतीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित युवती (वय 22) कर्जत तालुक्यातील असून तिने दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हॉटेल मालक जनार्धन जाधव (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) आणि एका अनोळखी कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती एका व्यक्तीची चौकशी करण्यासाठी शनिवारी (11 एप्रिल) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हॉटेलवर गेली होती. त्यावेळी तिथे असलेल्या कामगाराने तिला माहिती न देता हॉटेल मालक जनार्धन जाधव याला बोलावले. जाधव याने युवतीसोबत अरवाच्च भाषेत बोलणे सुरू केले. युवतीने विरोध केला असता, कामगाराने तिचा हात धरला आणि मालकाने तोंड दाबून तिला जबरदस्तीने हॉटेलच्या वरील मजल्यावर असलेल्या खोलीत ओढत नेले.

खोलीत नेल्यानंतर कामगाराने पीडितेची ओढाताण केली आणि तो बाहेर निघून गेला. त्यानंतर जनार्धन जाधव याने पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. जाताना खोलीला बाहेरून कडी लावून तिला डांबून ठेवले. पीडितेने हिंमत दाखवून खोलीच्या दरवाजाला लाथ मारून तो उघडला आणि खाली आली. मात्र, दोन्ही संशयित आरोपींनी तिला खाली पाडून मारहाण केली. जर कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत मारून टाकू, अशी धमकीही त्यांनी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून रविवारी (12 एप्रिल) फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (अहिल्यानगर ग्रामीण) शिरीष वमने करीत आहेत.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...