Monday, May 25, 2026
Homeक्राईमAhilyanagar : एकतर्फी प्रेमातून लग्न करण्यासाठी तरूणीचा केडगावात गोंधळ

Ahilyanagar : एकतर्फी प्रेमातून लग्न करण्यासाठी तरूणीचा केडगावात गोंधळ

मुलाच्या कुटुंबासह स्वत:ला संपवून टाकण्याची धमकी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील केडगाव परिसरात एकतर्फी प्रेमातून एका तरूणीने एका कुटुंबाच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याची घटना मंगळवारी (28 एप्रिल) दुपारी 12:30 ते तीन वाजताच्या दरम्यान घडली आहे. मुलाशी लग्न लावून द्या, अन्यथा तुम्हांला किंवा स्वतःला चाकूने संपवून टाकेन, अशी धमकी देत या तरूणीने संपूर्ण कुटुंबाला घरातच अटकाव केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

केडगावातील 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सावेडी उपनगरातील निर्मलनगर परिसरात राहणार्‍या तरूणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा मुलगा आणि संबंधित तरूणी यांची ओळख महाविद्यालयात झाली होती. तेव्हापासून ही तरूणी त्या मुलावर एकतर्फी प्रेम करत होती. फिर्यादी कुटुंबाने तिला वारंवार समजावून सांगूनही तिने आपला हट्ट सोडला नाही. यापूर्वीही तिने घरासमोर येऊन आत्महत्येची धमकी दिली होती, ज्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.

मंगळवारी दुपारी पुन्हा या तरूणीने फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. मला तुमच्या मुलासोबत लग्न करायचे आहे, मी येथून हलणार नाही, असे म्हणत ती दरवाजापाशी ठाण मांडून बसली. फिर्यादी कुटुंबाने तिला बाहेर जाण्यास सांगितले असता तिने बॅगेतील चाकूचा धाक दाखवला. तुम्ही मला बाहेर काढले तर मी तुमच्यावर वार करीन किंवा स्वतःला इजा करून घेईन, अशी धमकी देऊन तिने कुटुंबाला बराच वेळ घरातून बाहेर जाण्यास मज्जाव केला. काही वेळाने पुन्हा येण्याची धमकी देऊन ती निघून गेली. या प्रकारानंतर फिर्यादी कुटुंबाने कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ मे २०२६ – महासत्तेच्या नेतृत्वाचा घसरता आलेख

0
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या वादळी कार्यकाळापासून ते दुसर्‍या कार्यकाळाच्या चालू टप्प्यापर्यंत, प्रत्येक निर्णयाने, विधानाने आणि वादग्रस्त परराष्ट्र धोरणाने केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर...