Thursday, March 27, 2025
Homeनगरयुवतीचा मृतदेह रेल्वे पुलाजवळ आढळला

युवतीचा मृतदेह रेल्वे पुलाजवळ आढळला

आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कल्याण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ (Kalyan Highway Railway Flyover) रविवारी पहाटे एका 19 वर्षीय युवतीचा मृतदेह (Young Woman Dead Body) आढळून आला. मनिषा सुभाष बेलापुरकर (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) असे मयत युवतीचे नाव आहे. तिने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नालेगाव भागात लेडी डॉन मनी नावाने परिचित असलेल्या मनिषाचा मृतदेह पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी तिला मृत घोषित केले.

- Advertisement -

तोफखाना पोलीस ठाण्याचे (Topkhana Police Station) जिल्हा रूग्णालयात नियुक्त असलेले सहाय्यक फौजदार जठार यांच्या खबरीवरून तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मनीषा हिच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर काहींनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली. मात्र, शवविच्छेदनानंतर ही शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. मयत मनीषाच्या आईचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्यानंतर घरगुती वादातून तिने आत्महत्या (Suicide) केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. अधिक तपास पोलीस अंमलदार भास्कर गायकवाड करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ATM : चाेरट्यांनी एटीएम मशिन पळविले

0
नाशिक। प्रतिनिधी Nashik एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही कॅमेरे जाळून चाेरट्यांनी एटीएम मशिन चाेरुन नेले आहे. ही घटना मुंबई नाका पाेलिसांच्या हद्दीतील विनयनगर परिसरात घडली असून मशिनमध्ये...